Uncategorized

……” शिवसेनेचे नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल यांचे काम ” बेधडक – देधडक “

महावीर पेठेतील " स्वखर्चाने " बसविले गटारावरील तुटलेले झाकण !

व्यापारी वर्गाने व नागरिकांनी मानले ” नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल ” यांचे आभार…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

नवनिर्वाचित शिवसेनेचे ” नगरसेवक ॲड . रोहित ओसवाल ” यांचे काम नेहमीच ” बेधडक – देधडक ” असे असून आजवर त्यांनी अनेक कार्य ” स्वखर्चाने ” केली आहेत . कर्जत नगर परिषद हद्दीतील महावीर पेठे येथील कपालेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रत्यावरील गटाराचे झाकण खराब झाले असता ” अपघाताची ” शक्यता असल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ” स्वखर्चाने ” ते गटारावरील झाकण दुरुस्त करून त्याची डागडुजी करून नागरिकांची सुरक्षितता जपली . 

         

याबाबतीत सदर तक्रार कर्जत नगर परिषदेस केली असती तर त्याला उशीर झाला असता व तोवर सदरच्या मुख्य रस्त्यावर कुणाचाही चालताना , अथवा वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती . सदरची तक्रार नगरसेवक ॲड रोहित ओसवाल यांच्याकडे आल्यावर त्यांनी तातडीने पाऊले उचलत येथील झाकण काढून स्वखर्चाने दुरुस्त केले व व्यवस्थित त्या गटारावर बसवून तेथे अपघात टाळला गेला .

     

सदर गटार वरचे तुटलेले झाकण ॲड रोहित ओसवाल यांनी ठीक केल्याने असे कार्य ” नगरसेवक नव्हे तर एक जनसेवकच ” करू शकतो , असे गौरोदगार व्यापारी वर्ग , नागरिक , व परिसरातील रहिवासी वर्गाने काढले व त्यांचे धन्यवाद व्यक्त केले . यावेळी नगरसेवक ॲड रोहित राजेंद्र ओसवाल यांच्या सोबत कुणाल गुप्ता यांनी देखील मोलाचे सहकार्य केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!