….” माता रमाई जयंती निमित्त आर पी आय (आ ) पक्षा तर्फे किरवली येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न “…..
" जीवक आयुर्वेद रूग्णालय - चांधई " यांचे सहकार्य !

कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांचा पुढाकार…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील किरवली येथे ” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ” शाखा कर्जत तालुक्याच्या वतीने कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांच्या नेतृत्वाखाली ” माता रमाई भीमराव आंबेडकर ” यांच्या जयंतीचे औचित्य साधून ” मोफत आरोग्य शिबिर ” आयोजित करण्यात आले होते . या शिबिरास ” जीवक आयुर्वेद रूग्णालय – चांधई ” यांचे सहकार्य लाभले .
शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी २०२६ रोजी ” माता रमाई भीमराव आंबेडकर ” जयंती निमित्त , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षा तर्फे मौजे किरवली येथे मराठी शाळेमध्ये ,
चांधईतील जीवक आयुर्वेद रूग्णालयाच्या सहाय्याने आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष मा. हिरामण भाई रघुनाथ गायकवाड यांनी आयोजित केले होते . यामध्ये जीवक रूग्णालयाच्या डॉक्टरांनी विविध व्याधींवर ऊपचार केले व सल्ला दिला . यांत शास्त्रोक्त पद्धतीने नाडी परीक्षण , इसीजी व शुगर चेकअप , उच्च रक्तदाब तपासणी , आरोग्य विषयक सल्ला , दीर्घकालीन आजार आणि पुनर्वसन , संधिवात, आमवात , पक्षाघात (लकवा), विविध वात व्याधी व्हेरिकोज व्हेन , जुनाट सर्दी व खोकला , त्वचा विकार व बालकांचे विकार , वंधत्व व मासिक पाळीचे विकार , विशेष वैद्यकीय सहाय्य – मेंदू संबंधी आजार , स्थूलपणा, थायरॉईड, प्रमेह अश्मरी, उच्च रक्तदाब इत्यादी संबंधित उपचार , संपूर्ण शरीर आरोग्य उपचार , पंचकर्म थेरपी व औषधी उपचार अग्निकर्म व विध्दकर्म , शारीरिक व मानसिक व्याधी , आहार व विहार विषयक मार्गदर्शन , पचना संबंधी विकार , डोळ्यांचे आजार आदी तपासणी ग्रामस्थ , महिला वर्ग , युवती विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने केली.
या शिबिरात चांधई येथील जीवक रुग्णालयाचे प्रशासक डॉ. अशोक लोंढे , पक्षाघात आणि वात व्याधीवरील तज्ञ डॉ. प्रियांका दोरगे , सिस्टर तृप्ती काळे , सुनीता जाधव तसेच सहाय्यक रंजना कदम यांनी सेवा दिली , तसेच अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरात ऊत्साहाने सहभाग नोंदवला. किरवली मराठी शाळेच्या मुख्याध्यापीका सौ.प्रियांका हरवंदे यांनी जीवक रुग्णालयाच्या डॉ . व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले तर आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले .




