…..” भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट विरोधात आंदोलन हाय हॉल्टेजवर “….
मागण्या मान्य न केल्यास आंदोलन चिघळणार , " सुधाकर भाऊ घारे व नितीन दादा सावंत " यांचा प्रशासनाला इशारा !

मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
येथील स्थानिक आदिवासी , ग्रामस्थ यांच्या हक्काच्या जमिनी व घरे घेऊन देशोधडीस लावणाऱ्या भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट व्यवस्थापनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा सुधाकर भाऊ घारे यांनी आमच्या मागण्या मान्य न केल्यास टाटा प्रोजेक्ट गेट मधून आत घुसून व्यवस्थापनाला याचा जाब विचारला जाईल , असा सज्जड इशारा दिला असल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून यावर टाटा अधिकारी अभिजीत पाटील , सी बी सिंग , विवेक माटे , व इतर बोलणी करण्यास आलेल्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना परत पाठविण्यात आले .
यावेळी भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट दंडेलशाली विरोधात उपोषणास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , जेष्ठ नेते नारायण डामसे , शेकाप नेते तानाजी मते आदी पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले आहेत .
वेळोवेळी येथील स्थानिक नागरिकांना रोजगार , इतर कामे , आरोग्य सेवा , शिक्षण , पुनर्वसन , सोई सुविधा बाबत टाटा प्रोजेक्टचे अधिकारी म्हात्रे यांची हकालपट्टीची जोरदार मागणी सुधाकर भाऊ घारे व नितीन दादा सावंत यांनी केली , तर दोन दिवसांपूर्वी आदिवासी बांधवांना घरांसाठी पुनर्वसन करताना कुणालाच विश्वासात न घेतल्याने केलेल्या दिशाभूलीवर भूमिपूजन करणाऱ्यांवर पोलीस कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली . हा तिढा अद्यापी सुटला नसून टाटा पॉवर प्रोजेक्ट व्यवस्थापन यावर काय निर्णय घेतात , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .
भिवपुरी टाटा पॉवर प्रोजेक्ट गेट समोर झालेल्या उपोषण स्थळी सुनील पाटील , साबळे , अशोक भोपतराव , अंकित साखरे , बाजीराव दळवी , बाबू घारे , पंढरीनाथ राऊत , तानाजी मते , एकनाथ धुळे , बंधू पाटील , दिपक श्रीखंडे , भगवान शेठ भोईर , पंकज पाटील , उमेश आप्पा गायकवाड , मधुकर भाऊ घारे , शैलेश पालकर , अश्विनी पाटील , रंजना धुळे , बिनीता घुमरे , बळवंत घुमरे , निलेश भाई घरत , अरुण हरपुडे , रामदास घरत , सुनील गायकवाड , संतोष बैलमारे , सोमनाथ पालकर , पुष्पा दगडे , सुवर्णा निळधे , केतन बेलोसे , सोमनाथ ठोंबरे , राजेश देशमुख त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते , स्थानिक ग्रामस्थ , महिला वर्ग उपस्थित होते . संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या उपोषणाचा उलगडा झाला नव्हता .
मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते…..



