” शिल्पकार साहित्य कला मंडळ ” यांच्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर अन्नदान वाटप !
६ डिसेंबरला अभिवादन करून परतणाऱ्या अनेकांनी घेतला लाभ.....

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
भारतीय घटनेचे शिल्पकार – महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर २०२५ रोजी ६९ व्या ” महापरिनिर्वाण ” दिनी दादर ” चैत्यभूमी ” येथे त्यांच्या पवित्र स्मृतिस व महान विचारांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून , पुन्हा परतीच्या वाटेकडे जात असलेल्या रेल्वे गाडीतील व रेल्वे स्थानकावर थांबलेल्या आंबेडकरी अनुयायी व बहुजन समाजाला कर्जत रेल्वे स्थानकावर ” शिल्पकार साहित्य कला मंडळाच्या ” वतीने दरवर्षी प्रमाणे आज दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी अल्पोपहार – अन्नदानाचे वाटप करण्यात आले . यावेळी अनेक आंबेडकरी अनुयायांनी या अल्पोपहाराचा आस्वाद घेतला .
शिल्पकार साहित्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत ” पांडुरंग अर्जुन उर्फ जीवन घोडके ” व सदस्य दिवंगत गोपीनाथ ओव्हाळ यांच्या प्रेरणेने अध्यक्ष नरेश भाई जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंडळ नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित असतात . दरवर्षी ” चैत्यभूमी ” दादर येथून ” विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ” यांना अभिवादन करून परतणाऱ्या बहुजन वर्गाला अल्पोपहार देऊन अन्नदान कार्यक्रम करतात .
यावेळी ” शिल्पकार साहित्य कला मंडळाचे ” अध्यक्ष नरेश भाई जाधव , माजी अध्यक्ष अशोकदादा सोनावळे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ” अन्नदान ” कार्यक्रमास सुरुवात झाली . यावेळी शिल्पकार साहित्य कला मंडळाचे अध्यक्ष नरेश भाई जाधव यांच्या नेतृत्वाखाली , सचिव – कमलाकर जाधव , उपाध्यक्ष – महेंद्र गायकवाड , जयवंत जाधव – जेष्ठ सल्लागार , अशोक दादा सोनावळे , वामन शिंदे तसेच प्राण मोरे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून सर्वांना अन्नदान वाटप करण्यास सहकार्य केले .



