…..” विकास घडविणारे शिल्पकार , आपल्या हक्काची माणसे “……
प्रभाग क्रमांक ९ दहिवली बाम चा मळा परिसरात " परिवर्तन विकास आघाडी " ची जोरदार मोर्चे बांधणी !

उमेदवार ” सौ. चित्रा किशोर शितोळे व कुमेश पांडुरंग मोरे ” यांना मतदारांचा भक्कम पाठिंबा…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
निवडणुका आल्या , उमेदवारी मिळाली , म्हणून मतदार माय – बाप जनतेच्या समोर जायचं , हे इतर उमेदवारांच काम असेल , पण आपली ” हक्काची माणसे ” नेहमीच रात्रंदिवस जनतेच्या अडीअडचणीला , समस्येला धावून येत असतात . असेच ” जनसेवक ” असलेले कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली – बाम चा मळा – आकुर्ले , तर ते आमराई प्रभाग क्रमांक ९ मध्ये कर्जतकरांच्या सर्वागीण विकासाची , परिवर्तन विकास आघाडी , या परिवर्तन विकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व इतर मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार ” सौ. चित्रा किशोर शितोळे व कुमेश पांडुरंग मोरे ” यांनी आज प्रचाराचा नारळ दहिवली गणेश मंदिर , साई मंदिर येथे वाढवून प्रचाराला सुरुवात केली .
यावेळी बाम चा मळा , गणेश मंदिर परिसरात माय बाप मतदारांचा प्रचारा दरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . या परिसरात किशोर भाऊ शितोळे यांचे गेली अनेक वर्षे जोरदार कार्य आहे . आपल्या ” हक्काचा माणूस ” म्हणून त्यांचे कार्य अहोरात्र सुरू असल्याने प्रत्येक घराघरात त्यांना मानणारा वर्ग आहे. यापूर्वी ” जनसेवक ” असलेले किशोर भाऊ यांच्या पत्नी ” सौ. चित्रा किशोर शितोळे ( देशमुख ) ” या निवडणुकीस सामोरे जात असल्याने व त्यांच्या जोडीला ” कुमेश पांडुरंग मोरे ” हे आकुर्ले परिसरातील उच्चशिक्षित उमेदवार असल्याने त्यांचे कार्य देखील उल्लेखनीय असून या दोन्ही उमेदवारांना वाढत्या पाठिंब्याने परिवर्तन विकास आघाडीची ” ताकद ” दिवसेंदिवस वाढत आहे . हे दोन्ही उमेदवार ” विजयाच्या उंबरठ्यावर ” असून परिवर्तन विकास आघाडी चा ” विजयाचा झेंडा ” नक्कीच प्रभाग क्रमांक ९ मध्ये फडकणार , यांत शंकाच नसेल .




