Uncategorized

…..” पर्यावरण चळवळीचे प्रणेते ॲड. कैलास मोरे यांच्या आवाजाला हजारो कर्जतकर नागरिकांचा प्रतिसाद “……

कर्जतमध्ये " पर्यावरण दिनी " वृक्षसंवर्धनाचा निर्धार !

” हम भी कुछ कम नही , एक पेड कर्जत के नाम ” उपक्रम जल्लोषात संपन्न……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

हजारो कर्जतकरांच्या साक्षीने आज शुक्रवार दिनांक ०५ जून २०२६ रोजी पर्यावरण दिनी वृक्षसंवर्धनाचा निर्धार सामाजिक चळवळीचे प्रणेते ॲड. कैलास मोरे यांनी केला असता हजारो पर्यावरण प्रेमी उपस्थित रहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम कर्जत तालुक्यात संपन्न झाला .


         

         ” जागतिक पर्यावरण दिना ” निमित्त ५ जून रोजी ॲड. कैलास मोरे यांनी सुरू केलेल्या ” एक पेड कर्जत के नाम ” या उपक्रमाला कर्जत तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत अनेक नागरिकांनी आपल्या परिसरात झाडे लावली, तर काहींनी आधीपासून असलेल्या झाडांचे ” संवर्धन व संरक्षण ” करण्याचा संकल्प करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.


           

           दिवसेंदिवस वाढणारे तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास , याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शहरी भागात जागेअभावी किंवा अन्य कारणांमुळे झाडे लावता न आलेल्या नागरिकांनीही “ आहे ती झाडे जपण्याचा ” निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमाला प्रतीकात्मक आंदोलनाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे. कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विविध ” वीज व धरण ” प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यावरणप्रेमींनी यापूर्वी १८ मे रोजी या विषयावर ” लाक्षणिक आंदोलन ” केले होते. त्याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून ” पर्यावरण दिनी ” नागरिकांनी आपल्या जागेत ” एक झाड ” लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

             कर्जत हे पर्यटनस्थळ आणि निसर्गसंपन्न क्षेत्र म्हणून ओळखले जाते. मात्र विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन व वृक्षतोड झाल्यास स्थानिक पर्यावरणाला ” धोका ” निर्माण होऊ शकतो, अशी चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

            ” हम भी कुछ कम नही “, असे म्हणत “ प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवावे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन व हाक या उपक्रमाच्या माध्यमातून ” पर्यावरण चळवळीचे प्रणेते ॲड कैलास मोरे ” यांनी केले होते , त्यामुळे कर्जतमध्ये पर्यावरण दिनी वृक्षसंवर्धनाचा निर्धार करत हजारो हात वृक्षारोपणासाठी लागून , कर्जत तालुक्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील होऊ घातलेल्या प्रकल्पांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही यावेळी या कृतीतून शासनाकडे करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!