…..” लेखणी संघर्षातुन घडलेला मराठी मनाचा शिवप्रेमी योद्धा “……
" त्यांचे जगणे - त्यांचे विचार - त्यांची तळमळ आणि त्यांचा संघर्ष " हा अनेकांसाठी " प्रेरणेचा " ऊर्जास्रोत !

लेखणी व विचारांचा दीपस्तंभ – पत्रकार साबीर भाई शेख……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आपल्या लेखणीतून ” संघर्ष ” करून जन सामान्य नागरिकांना सातत्याने ” न्याय ” देण्याचा प्रयत्न करणारे , त्यांचे जगणे – त्यांचे विचार – त्यांची तळमळ आणि त्यांचा संघर्ष हा अनेकांसाठी ” प्रेरणेचा ऊर्जास्रोत असलेले , लेखणीचा व विचारांचा दीपस्तंभ म्हणजे ” लेखणी संघर्षातुंन घडलेला मराठी मनाचा शिवप्रेमी योद्धा पत्रकार ” साबीर भाई शेख “

काही व्यक्तींचा जन्म हा केवळ स्वतःसाठी नसतो , तर समाजाला दिशा देण्यासाठी , अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि वंचितांच्या वेदनांना औषध रुपी मलम लावून समस्या सोडविण्याचे ध्येय घेऊन जन्माला येतात . अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे खोपोलीतील संघर्ष नेते , पत्रकार ” साबीर भाई शेख “. ” जो झुकता नहीं सत्यासाठी , तोच इतिहास घडवतो संघर्षासाठी ” या भावनेतून कार्यरत असलेले , अल्पसंख्याक नेते , पत्रकार , समाजसेवक , साहित्यप्रेमी आणि सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संवेदनशील मन, निर्भीड लेखणी आणि न्यायासाठी झगडण्याची वृत्ती , हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

” हक्कांसाठी लढताना ” जन शक्तीची साथ मिळविणारा ” योध्दा ” म्हणून त्यांची ओळख आहे . अभियांत्रिकी शिक्षणाची भक्कम पार्श्वभूमी लाभलेले उच्चशिक्षित ” साबीर भाई ” यांनी केवळ व्यावसायिक यशावर समाधान मानले नाही , तर समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे ध्येय त्यांनी स्वीकारले. पत्रकारिता – सामाजिक – राजकीय – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक – कला – क्रिडा – साहित्य क्षेत्रात आपल्या कार्याचे ” पैलू ” पाडत विविध सामाजिक चळवळींच्या माध्यमातून त्यांनी ” जनसेवेचा ” अखंड वसा जपला व लोकसेवेचे ” शिल्प ” घडविले .

” सा. सामान्य नागरीक ” वाहिनी वृत्तपत्राच्या लेखणीतुंन अनेकांना न्याय मिळवून देताना कळत – नकळतपणे त्यांच्या विचारांनी असंख्य युवकांना प्रेरणा दिली. संविधानिक मूल्ये , धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवरील दृढ विश्वास हे त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. देशप्रेम आणि मानवतेची भावना मनाशी बाळगून त्यांनी समाजात सलोखा – समता आणि बंधुभावाचे विचार रुजविण्याचे कार्य केले.

” देशधर्म भारतीयांना जोडण्यासाठी आणि संविधान , लोकशाही मजबूत करण्यासाठी ” त्यांचे अविरत कार्य चौफेर दिसून येत आहे . सार्वजनिक जीवनात समाजाच्या उन्नतीसाठी विविध पक्ष, संघटना, संस्था, सामाजिक आंदोलने आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने संघर्ष केला व त्यातून छत्रपती शिवाजी महाराज , भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात पेरले . त्यांच्या नेतृत्वात संवेदनशीलता आहे , त्यांच्या शब्दांत प्रामाणिकपणा आहे , आणि त्यांच्या कृतीत समाजहिताचा ध्यास आहे .

अहोरात्र ” दीप स्तंभा ” प्रमाणे ” साबीर भाई ” यांचे जगणे, त्यांचे विचार, त्यांची तळमळ आणि त्यांचा संघर्ष हा अनेकांसाठी ” प्रेरणेचा स्रोत ” आहे. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक ऊर्जा, माणुसकी आणि जिद्दीचा अनुभव येतो , म्हणूनच ते अनेकांसाठी केवळ नेते किंवा पत्रकार नसून एक ” मॅग्नेटिक मॅन “, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि संघर्षाचे प्रतीक आहेत.

त्यांच्या विचारांचा प्रकाश समाजात असाच अधिकाधिक पसरत राहो, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, तसेच त्यांची लेखणी सदैव सत्य – न्याय आणि जनहितासाठी झुंजत राहो, हीच ईश्वरचरणी त्यांच्या ” शनिवार दिनांक ०६ जून २०२६ ” या वाढदिवसानिमित्त मनापासून प्रार्थना.



