……” निकोप येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न “…….

हि शाखा निकोप व परिसरातील नागरिकांच्या समस्या निराकरणाचे मुख्य केंद्र बनेल – आमदार महेंद्र शेठ थोरवे
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेना अधिक मजबूत होण्यासाठी व येथील विकास कामांना व समस्या सोडविण्यासाठी गती येण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेचे औचित्य साधून मौजे निकोप येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन समारंभ आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि शिवसैनिकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाले. यावेळी आदिशक्तीचे आशीर्वाद घेत जनसेवेच्या नव्या पर्वाचा शुभारंभ करण्यात आला.

या शाखेच्या माध्यमातून मौजे निकोप व परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. नागरिकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हे कार्यालय जनसेवेचे प्रभावी केंद्र बनेल, असा विश्वास याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे जोरदार स्वागत केले.

” हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ” यांनी दिलेला ” ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ” हा मूलमंत्र जपत शिवसैनिक सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध राहणे, हेच शिवसेनेचे खरे कार्य आहे.

यावेळी ” निलेश झांजे ” यांची निकोप उप शाखाप्रमुख व ” प्रशांत दुर्गे ” यांची मोहिली उपशाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत पुढील वाटचालीसाठी व शिवसेना संघटन वाढीसाठी शुभेच्छा दिल्या. ” जनसेवेचा ध्यास, जनतेचा विश्वास आणि शिवसेनेचा भगवा ” कर्जतच्या सर्व भागात ” अभिमानाने ” फडकवत ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी उपतालुका प्रमुख भरत डोंगरे , मा.सभापती राहुल विशे, मा.सरपंच हरीचंद्र नीरगुडा , प्रशांत झांजे, विभागप्रमुख पोशीर भानुदास राणे, विभागप्रमुख कळंब दशरथ ऐनकर, रवी फोपे, संदीप राणे, रमेश गवळी, अतुल डायरे, प्रवीण चौधरी, बबलू डायरे तसेच निकोप गावातील शाखाप्रमुख विजय शिंदे, आत्माराम झांजे, ह.भ.प.विश्वास महाराज, सुधीर झांजे, प्रशांत दुर्गे, भगवान दुर्गे, विकेश झांजे व शिवसैनिक , महिला वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.