…..” खालापूर तालुका प्रमुख प्रशांत खांडेकर यांचा करिष्मा , उंबरविरा ठाकूरवाडीमध्ये राष्ट्रवादीला खिंडार “…..
कार्यसम्राट आमदार " महेंद्र शेठ थोरवे " यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास !

राष्ट्रवादीचे आदिवासी सेल तालुकाध्यक्ष, बीडखुर्द ग्रामपंचायत सदस्या यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा ” शिवसेनेत ” जाहीर पक्षप्रवेश……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा ” वारू ” आता चौफेर उधळत असून ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अनेकांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडत आहे. एका पाठोपाठ एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार ” धक्के ” देत हि गळती शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पोहचली आहे. खालापूर तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील ” उंबरविरा ठाकूरवाडी ” मधील अजित पवार गट राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुणांसह शेकडो ग्रामस्थांनी कर्जतमधील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे बीडखुर्द ग्रामपंचायत हद्दीत शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे चित्र समोर आले आहे.

या पक्ष प्रवेश सोहळ्या कार्यक्रमात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी गावातील समस्या सोडवण्यासाठी आपण तत्पर असून, नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नाही, असे सांगितले. गावातील समस्या जाणून घेत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून, पक्षात सर्वांना सन्मानाची वागणूक देत गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करू या, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी कोट्यवधींचा निधी आणत या मतदार संघात वाड्या-पाड्यांवर विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे आदिवासी-ठाकूर समाजातील समाजबांधव त्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवत असून, पुढील काळात आपल्या वाडी-वस्तीचा विकास व्हावा , यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची ताकद मजबूत करण्याच्या उद्देशाने हा पक्षप्रवेश झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या पक्षप्रवेशात राष्ट्रवादीचे आदिवासी सेल तालुका अध्यक्ष परशुराम सांबरी, बीडखुर्द ग्रामपंचायत सदस्या मालीबाई सांबरी, नामदेव हिंदोळा, राजेश पारधी, राजू सांबरी, धर्मा भस्मा, शंकर हिंदोळा, पांडू चौधरी, वामन हिंदोळा, सुनील सांबरी, पप्पू सावंत, काशीनाथ सांबरी, गणपत खैर, राम ठोंबरे, हिरामण हिंदोळा, रवींद्र हिंदोळा, धर्मा सांबरी आदी प्रमुखांसह शेकडो ग्रामस्थ, महिला व तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश सोहळा तालुकाप्रमुख प्रशांत खांडेकर, बीडखुर्द ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अजित देशमुख, ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा यादव व राजेंद्र चोरगे यांच्या पुढाकाराने पार पडला.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख शिवराम बदे, खालापूर तालुकाप्रमुख प्रशांत खांडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, पंचायत समिती मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे, विधानसभा अधिकारी रोहित विचारे, अंकुश दाभने, कर्जतचे मा. सभापती तथा युवा सेना प्रमुख अमर मिसाळ, खालापूर पंचायत समिती सदस्य रितेश जाधव, प्रवक्ते सुरेश देशमुख, आदिवासी सेल विधानसभा प्रमुख गणेश केवारी, माजी उपसरपंच भरत पाटील, माजी उपसरपंच अजित पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा यादव, राजेंद्र चोरगे, युवासेना संपर्क प्रमुख राकेश सुखदरे, मारुती गायकर, अनिकेत खांडेकर, बाळू भगत, बळीराम मांडवकर, शरद पाटील, लक्ष्मण पारधी, ज्ञानेश्वर देशमुख, मोहन देशमुख, संतोष देशमुख, नरेश देशमुख, नाना देशमुख, संतोष यशवंत देशमुख आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक-युवासैनिक उपस्थित होते.




