…..” नांदगाव मध्ये राष्ट्रवादीचा बुरुज ढासळला “……
कर्जत तालुक्यात " शिवसेनेचा " राष्ट्रवादीला " धोबी पछाड " !

कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या कार्यावर विश्वास ठेवून ” आनंद आसवले ” यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आगामी काळात ” शिवसेना ” अधिक बळकट करण्यासाठी वेगाने ” राजकीय फासे ” टाकत आमदार महेंद्र शेठ थोरवे हे एक – एक प्यादे पुढे करून विरोधकांना धक्के देत आहेत. कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील श्री आनंद असवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

शिवसेनेचे संपर्क कार्यालय ” बाळासाहेब भवन ” येथे झालेल्या या कार्यक्रमात या सर्वांचे शिवसेनेत स्वागत करत , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सर्वांशी संवाद साधला. आदिवासी समाजातील कोळी, डोंगर कोळी, ठाकूर यांसह विविध समाज घटकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या या परिसरात आतापर्यंत अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. आगामी काळातही स्थानिकांना विश्वासात घेऊन विकासकामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर शिवसेना हा परिवार असून पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पूर्ण ताकद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आदिवासी बांधवांचा केवळ राजकीय वापर न होता त्यांच्या हक्कांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, त्यांच्या समस्या मार्गी लागल्या पाहिजेत आणि त्यांना विकासाचा योग्य वाटा मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. याच भूमिकेतून परिसरात बहुउद्देशीय आदिवासी भवन उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, आदिवासी समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेली कामे पुढेही प्रामाणिकपणे केली जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कर्जत परिसरात प्रस्तावित असलेल्या शिलार, पोशीर आणि अन्य धरण प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार असेल, तर सर्वप्रथम संबंधित शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा झाली पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि आवश्यक सुविधा याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या मिटविल्याशिवाय धरणांचे काम होऊ देणार नाही , अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी भूषण आसवले, प्रशांत आसवले, बळीराम वाघमारे, दिलीप वाघमारे, दत्ता वाघमारे, सिताराम वाघमारे, सागर भोसले, प्रदीप वाघमारे, विशाल भोसले, गोपाळ गोसावी, शंकर गोसावी, संतोष वाघमारे, किसन टोके, सागर वाघमारे, आकाश दिवेकर, हर्षद आसवले, हरिचंद्र बोराडे, प्रकाश मडके बंधू आसवले यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी विधानसभा संघटक शिवराम बदे, कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, शिवसेना पक्षाचे सल्लागार संतोष भोईर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, युवासेना विधानसभा कर्जत तालुका प्रमुख अमर मिसाळ, शिवसेना उपतालुकाप्रमुख भरत डोंगरे, अंकुश दाभणे, गणेश केवारी तसेच नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रतिभा कारोटे , हरिश्चंद्र निरगुडा , भानुदास राणे – विभागप्रमुख, रवी फोपे – संघटक , अमोल देशमुख , प्नागेश साबळे , मनोहर कारोटे , विनायक चोखट ,अभिजीत शिंगोले, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




