दिल्ली NCR

……” कर्जतमध्ये महाराष्ट्र भजन भूषण कै. गजानन बुवा पाटील यांचा ५५ वा गुरूपौर्णिमा समारंभ उत्साहात साजरा “……

" कै. गजानन बुवा पाटील स्मारक समितीचा " पुढाकार !

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या सह अनेक शिष्यगण – हितचिंतक – भजन प्रेमी – कर्जतकर यांची उपस्थिती…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

भारतीय संस्कृतीत ” गुरु – शिष्य ” परंपरेचा पवित्र उत्सव म्हणजे ” गुरु पौर्णिमा “. जिथे गुरु हे केवळ ज्ञानदाता नसून, संस्कार – विवेक आणि जीवनाला योग्य दिशा देणारे ” दीपस्तंभ ” मानले जातात. प्रथम हे सुंदर जग दाखविणारे जन्म दाते माता – पिता , विद्या दान देणारे विद्यासागर शिक्षक , तर जीवनात बोट पकडून जीवनाचे महत्व शिकविणारे मार्गदाता हे गुरू स्थानी असल्याने नेहमीच नतमस्तक होऊन ” आशीर्वाद ” रुपी पुढील दिवसांची शिदोरी घेण्याचा हा सोहळा असतो. महाराष्ट्रात भजन सम्राट म्हणून गौरविण्यात आलेले कर्जत तालुक्यातील डीकसळ येथे वास्तव्यास असलेले ” स्वर्गीय गजानन बुवा पाटील ” यांचा त्यांच्या शिष्यगणांनी ” गुरु पौर्णिमा उत्सव ” रविवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ठिक ४- ०० वाजता भजन भूषण स्वर्गीय कै. गजाननबुवा स्मारक सभागृह, कर्जत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास मोठ्या संख्येने शिष्यगण – हितचिंतक – भजन प्रेमी – कर्जतकर नागरिक यांची उपस्थिती होती.

           या सोहळ्यात स्वर्गीय गजानन बुवा पाटील यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून भजनाची सुरुवात त्यांचे शिष्य गणपतबुवा म्हात्रे पनवेल, नंतर इतर शिष्य गण श्रीधर काकडे , पावनी पाटील , रुद्र भंडारी , रुपेश पाटील (आदई पनवेल), ज्ञानेश्वरबुवा म्हात्रे , नारायण बुवा (उरण) , पेडणेकर बुवा (अलिबाग ) तसेच बुवांचे पट्टशिष्य विलासबुवा मनोरे – पेण , भालचंद्रबुवा विशे – बदलापुर , बल्लाळबुवा जोशी – नेरळ , उल्हास कासार , बाळुबुवा मिंढे महाळुंगे , जयवंत पाटील , महेश पाटील – अलिबाग यांनी भजनसेवा सादर केली , तर त्यांना शेखर रानडे , ज्ञानेश्वरबुवा खरे , छगनबुवा निमणे , आकाश काटे , सिध्दांत पाटील यांनी पखवाजाची तर धनंजय बेडेकर , महेश लघाटे , सुनील पालांडे , राजवर्धन देशमुख यांनी तबल्यावर साथ केली.

          ” भजन भूषण गजाननबुवा पाटील ”  स्मारक समितीचे अध्यक्ष दीपकबुवा करोडे , चिटणीस रवीबुवा लाड , खजिनदार सुनीलबुवा देशमुख यांच्यासह सुरेश भोईर , महेंद्र निगुडकर , सुर्याजी ठाणगे , अशोक थोरवे , किशोरबुवा बोराडे , जयेश शेलार यांच्यासह अनेकांनी  परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

           याप्रसंगी गजाननबुवांचे सर्व कुटुंबीय सदस्य श्री. वसंत पाटील , सुचिताताई वांजळे , शैलजा विशे , संगीता पवार , लीलाताई चंदन , प्राचीताई पाटील , संतोष पाटील, मोहन पाटील , कैलास पाटील , चिंतामणी पाटील , श्रीराम पाटील, तानाजी वांजळे , कौशीक वांजळे , प्रसन्न पाटील यांच्यासह अनेक मान्यवर त्याचप्रमाणे आमदार महेंद्रशेठ थोरवे , मनोहर दादा थोरवे , नगराध्यक्षा सौ.पुष्पाताई दगडे , उप नगराध्यक्ष संतोष दादा पाटील, नगर सेवक प्रशांत पाटील, नगर सेवक महेंद्र चंदन , नगरसेवक रोहीत ओसवाल , माजी नगराध्यक्षा सौ.वनिताताई म्हसे , यांच्यासह रंभाजीबुवा थोरवे , गणुदादा पाटील , राम काकडे , जोमा वाणी , विनायक तुपे , बाळुबुवा मिंढे ( श्रीपती बाबादेवस्थान, महाळुंगे ), ह.भ.प.मदन पाटील, आनंद जोशी , फुलावरे बंधु , हनुमंते , दिगंबर कांबळे , विभावरी हनुमंते , नीता देशमुख , शरद म्हसे आदी बुवांचे चाहते उपस्थित होते. तसेच पत्रकार सर्वश्री विजय भाऊ मांडे , संतोष पेरणे , रमाकांत जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!