…..” शिवशंभो युवा हायकर्स संस्था कर्जतचा देशव्यापी स्तुत्य उपक्रम “……
कर्जतमध्ये " वृक्षारोपण " कार्यक्रम उत्साहात संपन्न !

” वृक्षारोपण करणे ” हे एक प्रकारचे ” शिवकार्य ” तर वृक्षांचे ” संवर्धन ” करा , विकास दादा चित्ते यांनी केले आवाहन……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जतमध्ये शिवशंभो युवा हायकर्स संस्था कर्जत , भिवगड अखंड संवर्धन समिती गौरकामत, राजे प्रतिष्ठान कर्जत व परिक्षेत्र वन विभाग कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण हा देशव्यापी कार्यक्रम रविवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला . याप्रसंगी भिवगडाच्या पायथ्याशी व स्मशानभूमी परिसरात , सभोवती विविध जातीची एकूण २०० झाडे लावण्यात आली.

भिवगडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरामध्ये समीर शिंदे , परिक्षेत्र वन अधिकारी , कर्जत , चेतन डिंगोरे , वनपाल ढाक , शिवशंभो संस्थेचे अध्यक्ष विकास दादा चित्ते , भिवगड अखंड संवर्धन समितीचे सचिव शाहीर गणेश ताम्हाणे, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भोईर , शिवकार्यात व गड संवर्धनासाठी वाहून घेतलेले जेष्ठ पदाधिकारी समाधान दादा पाटील यांच्या हस्ते पूजन करणेत येऊन श्रीफळ वाढविण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय , श्री छत्रपती संभाजी महाराज की जय , जय भवानी , जय शिवाजी , हर हर महादेव या गर्जनांमध्ये पूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष वृक्ष लागवडीला सुरुवात करणेत आली . भिवगड संवर्धन समिती अध्यक्ष ऍड. योगेश देशमुख , पदाधिकारी अमोल मानकामे यांचे सहकार्य मिळाले. याप्रसंगी शिवशभो युवा हायकर्स कर्जत संस्थेचे अध्यक्ष विकास दादा चित्ते यांनी उपस्थित विविध संघटनाचे सदस्य यांचे स्वागत केले.

वृक्षारोपण करणे हे एक प्रकारचे शिवकार्य असल्याचे नमूद करून लावण्यात येणाऱ्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांना आवाहन विकास दादा चित्ते यांनी केले. या वृक्षारोपण मोहिमेत एकूण २०० वृक्ष लागवड करणेत आली. त्यात करंज, बांबू ,शिसव, कांचन, काजू , जांभूळ , चिंच या झाडांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी ज्ञानेश्वर देशेकर वनपाल धामणी , मोहन चव्हाण वनपाल खांडपे तुकाराम जाधव वनपाल खांडस , हिम्मत पाटील सेवानिवृत्त वनपाल व कर्जत पूर्व मधील वन कर्मचारी उपस्थित होते.
शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेचे उपाध्यक्ष सुधांशू वनगे, उप खजिनदार महेंद्र कर्वे, सचिव शैलेश सातपुते , सदस्य श्रावण गुप्ता, नेहा सातपुते , वैष्णवी गुप्ता , सानिया चंद्रकांत खाडे , श्रुती प्रशांत क्षीरसागर यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिवशंभो युवा हायकर्स , कर्जत संस्थेने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उगले, उल्हास नदी संवर्धन समितीचे समीर विद्वांस, विद्या विकास मंदिर शाळेतील शिक्षिका प्रेमा कोळी पितळे , इतिहास संशोधक सागर सुर्वेच्या नेतृत्वामध्ये शिव मल्हार गट दहिवली, मावळा प्रतिष्ठान पोलादपूर, बा रायगड परिवार सदस्य, तसेच शिवछत्रपती परिवार या संघटनेचे सदस्य उपस्थित होते. शिव कार्यात आघाडीवर असलेले समाधान दादा पाटील यांनी आवाहन केल्यानुसार हे सदस्य पोलादपूर ,पाली ,वसई, बदलापूर, कल्याण व मुंबई मधून विविध भागातून वृक्षारोपण करण्यासाठी आलेले होते.

संस्थेने आयोजित केलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विविध भागातून एकूण ५३ विविध संघटनेचे सदस्य व परिक्षेत्र वनविभाग कर्जत यांचे अधिनस्त असलेले ४० वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे सदस्य धरून एकूण उपस्थिती १०७ होती. भिवगडावर ट्रेकिंग साठी आलेले अनेक ट्रेकर यांनी वृक्ष लागवडीमध्ये हिर-हिरीने भाग घेतला. परिक्षेत्र वन अधिकारी समीर शिंदे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना या वन महोत्सवामध्ये सहभागी झाल्याबद्दल शिवशंभो युवा हायकर्स कर्जत,भिवगड अखंड संवर्धन समिती , राजे प्रतिष्ठान व उपस्थित सर्व वृक्षप्रेमींचे आभार मानले.
वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करून लावलेले वृक्ष जास्तीत जास्त जिवंत कसे राहतील याबाबत मार्गदर्शन केले. पृथ्वीचा व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी वृक्ष लागवड मध्ये सहभागी होऊन वन खात्याला सहकार्य करावे , असे आवाहन केले. परिक्षेत्र वन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व ठिकाणी वन खात्याचे नक्कीच सहकार्य राहील असे आश्वासित केले. ” वनवे लावू नये ” म्हणून सर्व विभागातील ग्रामस्थ यांना आवाहन केले. वृक्षारोपणासाठी उपस्थित असलेले सर्व वृक्षप्रेमींची नाष्टाची व्यवस्था शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्था व अखंड भिवगड संवर्धन समिती चे सचिव शाहीर गणेश ताम्हाणे यांनी केली होती.
वृक्षारोपण मध्ये सर्वांना बरोबर घेऊन, एक चांगले कार्य संस्थेने करून, समाजापुढे एक उत्तम आदर्श निर्माण करून ठेवल्याने अनेकांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक केले तर महेंद्र कर्वे , नेहा सातपुते – वृक्षारोपण मोहीम प्रमुख शिवशंभो युवा हायकर्स कर्जत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले .




