Uncategorizedदिल्ली NCR

……” कर्जतमध्ये आझाद समाज पार्टी तर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी “…..

आरक्षण - शिक्षण - समता - अधिकार - सामाजिक कार्याच्या योगदानाचे कार्यक्रमात स्मरण !

जिल्हाध्यक्ष ” सचिन भाई भालेराव ” यांचा पुढाकार……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

शिक्षण – समता – अधिकार – सामाजिक कार्याचे समाजात रोपटे लावून त्याला ” आरक्षणाची ” ताकद देऊन बहुजन समाजाची सर्व क्षेत्रात उन्नती मिळवून देणारे ” छत्रपती राजर्षी शाहू महाराज ” यांची जयंती आझाद समाज पार्टी तर्फे कर्जत बुद्ध नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ” सचिन भाई भालेराव ” यांच्या पुढाकाराने ही जयंती साजरी करण्यात आली . याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार मान्यवरांच्या शुभहस्ते अर्पण करण्यात आला.

         

              माझ्या विचारांची जयंती साजरी करण्यासारखीच ” आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज ” यांची जयंती देखील सणांसारखी साजरी करा , हे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या जयंती निमित्त पुढे नेण्याचा प्रयत्न आझाद समाज पार्टी तर्फे करण्यात आला . शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे यासाठी , त्यांना शालेय साहित्य वाटप करून खावू देखील वाटप करण्यात आला . तर महिलांना छत्री वाटप करण्यात आले . या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

          यावेळी या कार्यक्रमास आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन भाई भालेराव यांच्या सहित महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुमित साबळे , रायगड जिल्हा प्रभारी सिद्धार्थ सदावर्ते , रोहित जाधव , युवक अध्यक्ष ॲड. सम्यक सदावर्ते, कर्जत तालुका अध्यक्ष प्रशांत जाधव, तालुका सचिव रोहित सरावते, खोपोली शहराध्यक्ष प्रफुल मुंडे , तालुका उपाध्यक्ष किरण ढोले , मनोहर ढोले  , हरिश्चंद्र जाधव सर , त्याचप्रमाणे भीम गर्जना मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या महिला भगिनी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते , उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे , बांधकाम सभापती महेंद्र चंदन पाटील , नगरसेविका सौ . सुमिता योगेश आप्पा गायकवाड , तसेच माजी नगरसेविका मधुरा चंदन पाटील यांची उपस्थिती होती.

            यावेळी आझाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी यांनी राजर्षी शाहू महाराजांनी अधिकार – आरक्षण – शिक्षण – सामाजिक समता साठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करून बहुजन वर्गात त्यांच्या ” विचारांची ऊर्जा ” निर्माण करण्याचे काम यानिमित्ताने ” आझाद समाज पार्टी ” करत असल्याचे मत जिल्हाध्यक्ष ” सचिन भाई भालेराव ” यांनी मत व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!