……” आमदार साहेबांचं काम लय भारी – नागरिकांची सुरक्षा झाली आता करा सवारी “…….
रेल्वे पुलावरील " खड्डे व साईड पट्ट्या " भरल्याने कर्जतकर नागरिकांना दिलासा !

” नगरसेवक ॲड. संकेत दादा भासे ” यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचा प्रवास होणार सुखकर…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत शहराचा प्रवेशद्वार असलेल्या चार फाट्या जवळील रेल्वे पुलावरील रस्ता वाहन धारक व पादचारी नागरिकांसाठी खूपच महत्वाचा रस्ता आहे. दरवर्षी या रस्त्यावर ” खड्डे व साइड पट्टी ” मुळे प्रवास करणे जीवघेणा ठरत असताना नागरिकांची ” खबरदारी व सुरक्षा ” म्हणून कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी नुकतीच या रेल्वे पुलावरील रस्त्याची पाहणी करून या रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून सुस्थितीत केले असता नागरिकांच्या मागणीनुसार त्यांनी तातडीने साईडपट्ट्या देखील भरून घेतल्याने ” आमदार साहेबांचं काम लय भारी – नागरिकांची सुरक्षा झाली आता करा सवारी “…….अशी कौतुकाचे शब्द सर्वजण काढत आहेत . सदरचे काम शिवसेनेचे युवा नेते तथा कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक ” ॲड. संकेत दादा भासे ” यांच्या कार्य तत्परतेने त्यांनी करून घेतले असल्याचे चित्र दिसून येत आहे .

सदरचा रस्त्याची हमी , नक्की कुणाकडे ? असा प्रश्न दर वेळेला उपस्थित राहतो . Msrdc की सार्वजनिक बांधकाम विभाग , कर्जत नगर परिषद की जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक विभागाकडे ? असे असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नेहमीच दुर्लक्ष होत असे . पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हे काम तातडीने करून घेणे गरजेचे असल्याचे नगरसेवक ॲड संकेत दादा भासे यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कानावर घातल्याने आमदार साहेबांनी त्वरीत तत्परता दाखवून या चार फाटा व रेल्वे पुलावरील रस्त्याची पाहणी करून येथील खड्डे डांबर टाकून व नागरिकांच्या मागणीनुसार महत्वाची समस्या असलेली खचलेल्या साइडपट्ट्या देखील माती टाकून भरून घेतल्याने आता वाहनधारकांना व पादचारी पायी चालणाऱ्यांना सुरक्षितता मिळणार आहे .

नेहमीच कर्जतकर नागरिकांची सुरक्षिततेची काळजी घेणारे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे व नगरसेवक ॲड संकेत दादा भासे ” यांनी नागरिकांच्या मनातील हि रेल्वे पुलावरील रस्त्यावरील समस्या जाणून घेऊन रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून सुस्थितीत केले तर साइडपट्ट्या देखील भरून घेतल्याने नागरिकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे . या महत्त्वपूर्ण कार्यामुळे सर्वत्र ” आमदार महेंद्र शेठ थोरवे व नगरसेवक ॲड संकेत दादा भासे ” यांचे कौतुक होत आहे .




