…..” उल्हास नदीच्या पात्रात बेकायदेशीर बांधकाम , कर्जतला पुराच्या पाण्याचा धोका “…..
बामच्या मळ्यात बांधलेल्या " दगडी भिंतीमुळे " पाण्याचा प्रवाह बदलणार ? नागरिकांची " चौकशीची " मागणी !

या गंभीर घटनेकडे ” मुख्याधिकारी तानाजी चव्हाण , तहसीलदार धनंजय जाधव व जलसंपदा पाटबंधारे विभागाचे ” दुर्लक्ष…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत शहरातून जाणाऱ्या उल्हास नदीचे पात्र ” बेकायदेशीर ” बांधकामांमुळे दिवसेंदिवस लहान होत चालले असल्याने पावसाळ्यात तुडूंब भरून वाहणाऱ्या पाण्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण होऊन होणाऱ्या ” पुराचा धोका ” पात्राच्या पलीकडे राहणाऱ्या महावीर पेठ कडील घरांना होणार असल्याचे चित्र दिसत असून या गंभीर बाबींकडे कर्जत नगर परिषदेचे ” मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ” व कर्जत ” तहसीलदार धनंजय जाधव ” व जलसंपदा पाटबंधारे विभाग ” उप अभियंता ” यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे .

कर्जत नगर परिषद हद्दीतील बामच्या मळ्याकडील प्रभागात असलेल्या एका धन दांडग्या फॉर्म हाऊसच्या मालकाने येथे बेधडक डबर चे बांधकाम करून भिंत घालण्याचे काम बेकायदेशीरपणे सुरू केले आहे . हे काम नदीच्या पात्र लगत असल्याने याची परवानगी कर्जत नगर परिषद , कर्जत तहसीलदार व जलसंपदा पाटबंधारे विभागाची घेतली आहे का ? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून अश्या नदीच्या पात्रात दगडी भिंत बांधल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह बदलून याचा धोका उदभवू शकत असल्याने तातडीने हे बेकायदेशीर बांधकाम थांबवण्याची गरज आहे .

दरवर्षी मुसळधार पाऊस होऊन उल्हास नदीचे पात्र तुडूंब भरून वाहत असते . या पुराच्या पाण्याचा धोका कर्जत शहरातील महावीर पेठ नजीक राहणाऱ्या कुटुंबाला होण्याची शक्यता असते , त्यात आता हे दगडी बांधकामामुळे पाण्याचा लोट व त्याचा प्रवाह महावीर पेठ भागात अधिक वाढून हे पाणी शहरात घुसण्याची चिन्हे दिसून येत आहे . नदी संबंधित अधिकार हे कर्जत तहसीलदार , जलसंपदा पाटबंधारे विभागाकडे व नदीच्या पात्रात बांधकाम पूर्व परवानगी म्हणून कर्जत न. प. च्या मुख्याधिकारी यांच्याकडे येत असल्याने याची गंभीर दखल तातडीने घेऊन या कामाची चौकशी करून हे बेकायदेशीर बांधकाम असल्यास ते तोडणे गरजेचे असून सुट्टीच्या दिवशी सुरू असलेल्या या कामाबद्दल ” संशय ” व्यक्त केला जात आहे .




