…..” जुन्या कर्जत तहसील कचेरी टेकडीचे सुशोभीकरण करा , वृक्षारोपणातून ॲड. कैलास मोरे यांची मागणी “……
कर्जतमध्ये वृक्षारोपणाने " ॲड. कैलास मोरे " यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा !

” सामाजिक समस्यांची परखड बाजू मांडणारे ” ॲड. कैलास मोरे मित्रमंडळाचा व पर्यावरण प्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
गेली अनेक दशके कर्जत तालुक्यातील सामाजिक प्रश्नांना शासकीय दरबारी अधिकाऱ्यांकडे परखड बाजू मांडणारे ” सामाजिक संघर्षाचे प्रणेते ” तथा कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख , कर्जत तालुका वीज संघर्ष समिती व कर्जत तालुका पर्यावरण संघर्ष समितीचे सर्वेसर्वा ” ॲड कैलास मोरे ” यांचा वाढदिवस पर्यावरण प्रेमी व त्यांच्या मित्र परिवाराने वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा केला . यानिमित्ताने पर्यावरण पूरक वातावरणात कर्जत तालुक्यातील नागरिकांना ” मोकळा श्वास ” घेता यावा म्हणून , कर्जत शहरातील जुन्या तहसील कचेरी टेकडीचे ” पर्यावरणपूरक सुशोभीकरण ” करून नागरिकांसाठी निसर्गरम्य उद्यान विकसित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. कैलास मोरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करत त्यांनी ” पर्यावरण संवर्धनाचा ” संदेश दिला.

गुरुवार दिनांक १२ जून २०२६ रोजी सकाळी जुन्या तहसील कचेरी टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना सामाजिक संघर्षाचे प्रणेते ॲड. कैलास गणपत मोरे यांनी कर्जत नगर परिषद प्रशासनाने या टेकडीचा विकास आराखडा तयार करून येथे ” नाना-नानी पार्क , लहान मुलांसाठी खेळणी , ओपन जिम , अभ्यासिका , नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक तसेच हिरवळ जपणारे पर्यावरणीय उद्यान ” विकसित करावे, अशी मागणी केली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून हा परिसर शहरातील ” पर्यावरण पूरक श्वास घेण्याचे आकर्षणाचे केंद्र ” बनविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी कार्यक्रमाला कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील, उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील, नगरसेवक महेंद्र शेठ चंदन पाटील यांच्यासह राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक – कला क्रीडा , सांस्कृतिक – व्यापारी – ज्येष्ठ नागरिक – वकील क्षेत्र असे अनेक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक तसेच महिला वर्ग उपस्थित होते.

कर्जत शहरातील विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ॲड. कैलास मोरे यांनी कामगार, शिक्षण, वीजपुरवठा , रेल्वे समस्या आणि नागरी सुविधांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. महावितरणच्या वीज समस्यांबाबत त्यांनी लोकप्रतिनिधी व नागरिकांना एकत्र आणून समिती स्थापन केली होती. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे नागरिकांचे मत आहे.

सध्या कर्जत तालुक्यातील वीज , धरण प्रकल्प , अश्या विविध विकास प्रकल्पांमुळे होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाची गरज अधोरेखित करत त्यांनी ” वृक्षारोपणाची ” व्यापक मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांच्या ” संवर्धनाची ” जबाबदारीही स्वीकारण्यात आली आहे. उन्हाळ्यात वनव्यामुळे झाडांचे नुकसान होऊ नये , यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वेणगाव येथील ” श्रद्धा फाउंडेशन ” या संस्थेतील मानसिक आजाराने ग्रस्त निराधार रुग्णांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्याचाही उपक्रम आयोजित करण्यात आल्याने वाढदिवसाला समाजसेवेबरोबरच ” एक हात मदतीचा ” अशी जोड मिळाली आहे .




