…..” कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व जिल्हाधिकारी रायगड यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न “……
कर्मचाऱ्यांच्या " प्रशासकीय अडचणी, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांवर " सकारात्मक चर्चा !

जिल्हाधिकारी ” श्री किशन जावळे साहेब ” यांनी अनेक अडचणी थेट फोन लावून काढल्या निकाली……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
रायगड जिल्ह्यात शासकीय विभागात ” कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ” हि कर्मचाऱ्यांच्या समस्या व प्रलंबित मागण्या सोडवणारी एक महत्त्वपूर्ण कर्मचारी संघटना आहे . रायगड जिल्ह्यात असणाऱ्या महसूल व इतर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नुकतीच गुरुवार दिनांक ११ जून २०२६ रोजी ” मा. जिल्हाधिकारी, श्री. किशन जावळे साहेब ” , रायगड – अलिबाग यांच्या समवेत ” कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची ” ” प्रलंबित मागण्या आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यां ” बाबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मा. जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे साहेब आणि मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संदेश शिर्के साहेब यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक अडचणींवर बैठकी दरम्यानच थेट फोन लावून अनेक प्रश्न तात्काळ निकाली काढल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे .

या बैठकीत पुढील महत्वाचे मुद्दे आणि मागण्याविषयी चर्चा करण्यात आली – १) भरती व सेवा विषयक – याबाबतीत सरळ सेवा भरतीतील अनुशेष भरणे, अनुकंपा भरती प्रक्रियेला गती देणे आणि अधिसंख्य पदांची सद्यस्थिती .
२) आर्थिक व प्रशासकीय लाभ – आश्वासित प्रगती योजना, प्रलंबित वैद्यकीय बिले, निलंबन आणि पेन्शन प्रकरणांचा जलद निपटारा करणे.
३) बदल्या व पदस्थापना – ३ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे संकलन बदल, सेवा वर्ग करणे आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळेत सादर करणे.
४) महत्त्वाच्या पदांवर संधी – ३ डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी देणे.
५) विभागीय अडचणी – पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना महसूल विभागात काम करताना येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवर मार्ग काढणे.
६) सामाजिक उपक्रम – दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजना करणे. या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली .
याप्रसंगी मा. जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी , ” कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सर्व मागण्यांबाबत प्रशासन पूर्णपणे सकारात्मक असून, कर्मचाऱ्यांचा कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल , ” असे आश्वासन दिले.

सदर बैठकीला ” कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व संघटना ” यांचे श्री. सुरेश तांबे – (महासचिव, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य) , श्री. सुमित भुईगळ – (वरिष्ठ उपाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य) , श्री. राजेश सदावर्ते – ( मराठवाडा अध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना) , श्री. संजीव मोरे – ( जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, रायगड) , श्री. राहुल सूर्यवंशी – ( जिल्हाध्यक्ष, महसूल संघटना, रायगड ) , श्री. शिवाजी बिवराळे – ( सचिव, दिव्यांग विभाग ) , श्री. खंडू बागुल – (जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद विभाग रायगड) , श्री. सचिन ओव्हाळ – (कार्याध्यक्ष, जिल्हा परिषद विभाग) , श्री. विकास बडे – जिल्हा परिषद विभाग कोषाध्यक्ष) , श्री. संतोष साळगावकर – (जिल्हा परिषद विभाग चिटणीस) , श्री. राजेंद्र गायकवाड – (उपाध्यक्ष) आदी प्रतिनिधी उपस्थित होते , तर प्रशासनाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

या महत्त्वपूर्ण बैठकीत रायगड जिल्हाध्यक्ष श्री. संजीव मोरे यांनी प्रशासनाचे आणि उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले व बैठकीची सांगता झाली.




