Uncategorized

…..” युवराजच का , कार्यकर्ता का नाही ? “……

कोकण विधान परिषदेवर " सुधाकर भाऊ घारे " यांची वर्णी आवश्यक होती !

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांचे ” राजकीय पुनर्वसन ” हा प्रश्न अधांतरीच…..

 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

राज्यात ” भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी अजित दादा पवार या पक्षांची महायुती असल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाची उमेदवारीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला जात असल्याने मागील काळात हि उमेदवारी ” स्टँडिंग ” शिवसेना शिंदे गटाचे आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांना मिळाली होती . म्हणूनच येथील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून अपक्ष उमेदवारी लढवली होती , मात्र त्यांना त्यात अपयश येऊन त्यांचा ” पराभव ” झाला होता . अशीच परिस्थिती यापुढेही होणार असल्याने सुधाकर भाऊ घारे यांचे पुनर्वसन व्हावे , याकरिता कोकण विभाग विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली असती तर ते सद्यस्थितीत आमदार झाले असते . म्हणूनच युवराज का , कार्यकर्ता का नाही ? अशी चर्चा सध्या कर्जत मतदार संघात होताना दिसत आहे .

          रायगड – सिंधुदुर्ग – रत्नागिरी या कोकण विभाग विधान परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडाचे खासदार सुनीलजी तटकरे यांचे सुपुत्र तथा युवराज ” अनिकेत तटकरे ” यांना उमेदवारी देण्यात आली होती . फक्त १६९ मतदार असलेल्या राष्ट्रवादीने केलेली ” हिंमत ” फारच वाखाणण्याजोगे होती . या निवडणुकीत केलेल्या ” चक्रव्यूह ” मध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ” ठाकरे सेनेचे ” उमेदवार बाळ माने यांच्यासहित सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीचे उमेदवार ” अनिकेत तटकरे ” यांचा बिनविरोध विजयी झाला आहे .

           मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येण्यासाठी ही उमेदवारी त्यांना दिली असती तर ते आज विधान परिषदेचे ” आमदार ” झाले असते . भविष्यात पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून स्टँडिंग आमदार शिवसेनेचे आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांना उमेदवारी मिळाल्यास ” सुधाकर भाऊ घारे ” यांचे ” राजकीय पुनर्वसन ” कसे होणार ? की पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून ” उपेक्षाच ” होणार की काय ? अशी चर्चा सध्या कर्जत मतदार संघात होत असताना दिसत आहे . म्हणूनच कोकण विभाग विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा ” युवराज ” का , ” कार्यकर्ता ” का नाही ? अशी चर्चा सध्या येथे जोर धरत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!