Uncategorized

……” कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा , भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकी आता दोन शिफ्टमध्ये सुरू “……

" कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन " च्या पाठपुराव्याला यश !

” कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे ” यांचे विशेष प्रयत्न……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गेली अनेक दिवस भिसेगाव परिसराकडे असणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांना तिकीट खिडकी दुपार नंतर बंद असल्याने नाहक त्रास होत होता . याबाबतीत अनेकांनी तक्रारी केल्या असता कर्जत रेल्वे पसेंजर असो. ने याबाबतीत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता . रेल्वे प्रशासनाने यावर ” देर है – दुरुस्त है ” याप्रमाणे कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवल्याने त्यांच्या या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून भिसेगाव पंचक्रोशीतील हजारो प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे . भिसेगाव बाजूच्या तिकीट बुकिंग खिडकीचे कामकाज आजपासून दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय व मानसिक त्रास आता कमी होणार आहे . यामुळे तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.

दुपारच्या काळात येथील खिडकी बंद असल्याने आणि गर्दीच्या वेळेत तिकीट मिळवण्यासाठी त्रास होत असे . तिकीट काढण्यास पुन्हा फलाट पार करून जावे लागत असे , यामुळे गाडी सुटण्याची भीती असे. याबाबतीत अनेक तक्रारी पसेंजर असो. कडे येत असल्याने त्याचा पाठपुरावा रेल्वे प्रशासनाकडे होत होता . यासाठी ” कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे ” यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे.

         या नव्या व्यवस्थेमुळे भिसेगाव परिसरातील तसेच स्थानकाच्या त्या बाजूने ये – जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी , महिला वर्ग , ज्येष्ठ नागरिक आणि नियमित प्रवाशांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे.

         तिकीट बुकिंग खिडकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

▪️ पहिली शिफ्ट : सकाळी ६.३० ते दुपारी २.३०

▪️ जेवणाची वेळ : दुपारी १२.१५ ते १२.३५

▪️ हिशोबाची वेळ : दुपारी २.३० ते २.४५

▪️ दुसरी शिफ्ट : दुपारी २.४५ ते रात्री १०.३०

▪️ जेवणाची वेळ : रात्री ८.४० ते ९.००

           या निर्णयामुळे कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत केले जात आहे व कर्जत रेल्वे पसेंजर असो. तसेच ” कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे ” यांचे विशेष आभार व्यक्त होत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!