Uncategorized

…..” रायगडात यासाठीच तटकरे – गोगावले – थोरवे – घारे यांची नाट्यमय दिलजमाई “…..

कोकण विभाग विधान परिषदेच्या जागेसाठी " अनिकेत तटकरे " यांची चर्चा !

उद्या सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्याची बैठक……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

रायगडात कोकण विभाग विधान परिषदेची सन २०२४ साली रिक्त झालेल्या जागेसाठी पुन्हा एकदा माजी आमदार ” अनिकेत तटकरे ” यांची वर्णी लावावी , या हेतूनेच राज्यात सत्तेत असलेल्या मित्र पक्षांच्या सहकार्यानेच हे साध्य होऊ शकते , म्हणूनच की काय रायगडात पालकमंत्री पदापासून सुरू असलेला शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले – खासदार सुनील तटकरे – आमदार महेंद्र शेठ थोरवे – जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्यातील ” कलगी तुरा ” मिटलेला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी वृत्त वाहिनी , सोशल मीडियावर एक महिन्यापूर्वी बातमी व्हायरल झाली , याचे कारण आता समोर आले आहे . उद्या रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी सुतारवाडी – रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत कोकण विभाग विधान परिषद निवडणुकी संदर्भात ” डावपेच ” आखण्यात येणार आहेत .

        गेली कोरोना कालानंतर आता पर्यंत सुरू झालेला हा तत्कालीन पालक मंत्री ” आदिती तटकरे – महेंद्र शेठ थोरवे – सुनील तटकरे ” यांच्याशी ” राजकीय संघर्ष ” तब्बल ५ वर्षे पहाण्यास मिळाला . तर कर्जत मतदार संघात राष्ट्रवादीचे माजी राजिप उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्यात विधानसभेची निवडणुकीत व त्यात पराभूत झाल्यावर तर अधिक तेज संघर्ष येथे पहाण्यास मिळाला आहे . रायगडात शिवसेनेचे ३ व भाजपचे ३ आमदार असतानाही पालकमंत्री पद या दोन्ही पक्षाला न मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी खूप मोठी ” ताकद ” लावून हे पद अडवून ठेवले होते . यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील पडद्यामागून साथ दिसली . 

           मात्र आता हे पालकमंत्री पद शिवसेनेला देऊन आपल्या पदरात मुलासाठी म्हणजेच गत वेळेला विधान परिषदेचे आमदार राहिलेले अनिकेत तटकरे यांच्यासाठी योग्य वातावरण हवे म्हणून हि ” दिलजमाई ” व पालकमंत्री पदावर पाणी सोडण्यास सुनीलजी तटकरे तयार झाल्याचे चित्र समोर येत आहे . रायगडात तटकरे – गोगावले यांची जरी समेट घडली असली तरी , कर्जतमध्ये थोरवे – घारे यांची ” हम आपके है कौन ? ” अशीच भूमिका व खरपूस समाचार घेऊन पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी भूमिका मांडली होती . म्हणूनच रायगडचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांना विधान परिषदेच्या १८ जून २०२६ निवडणुकीपूर्वी मिळाले तर या दिलजमाईची खऱ्या अर्थाने पुष्टी होणार आहे . 

             राष्ट्रवादी रायगडात ३ नंबरचा पक्ष असतानाही माजी आमदार अनिकेत तटकरे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीत उभे करून आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी कंबर कसली असून यासाठी ” व्यूहरचना ” ठरविण्यासाठी रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सुतारवाडी, कोलाड, ता. रोहा, येथे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि आगामी येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात तसेच संघटनात्मक बांधणीवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .  

         या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन प्रदेश अध्यक्ष तथा खा.सुनीलजी तटकरे , प्रमुख उपस्थिती नाम . आदितीताई तटकरे मंत्री, महिला व बालविकास, अनिकेतभाई तटकरे माजी आमदार, विधानपरिषद , तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी इतर पद धारकांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण निमंत्रक सुधाकर परशुराम घारे अध्यक्ष, रायगड जिल्हा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , अशोक शेठ भोपतराव – जिल्हा कार्याध्यक्ष , सुभाष केकाणे – जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!