Uncategorized

……” राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साखळी उपोषण आंदोलनाला अखेर यश “…….

वाहतुकीची कोंडी फोडणारा भिसेगाव येथील जुना " कर्जत - पनवेल हायवे " पर्यंतच्या रस्त्याचे काम होणार सुरु !

नगराध्यक्षा ” सौ . पुष्पा दगडे ” यांचे लेखी आश्वासनानंतर ” साखळी उपोषण ” स्थगित……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

गेली अनेक महिन्यांपासून बंद असलेला कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातून जुना ” कर्जत पनवेल हायवे ” पर्यंत जाणारा रस्ता वाहतुकीस मोकळा झाल्यास चार फाटा येथे विकेंड ऑफ ला होणारी वाहतुकीची कोंडी सुटेल , अशी मागणी ” राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कर्जत शहर अध्यक्ष ॲड. भाऊसाहेब पुंजू मोरे ” यांनी केली होती . याबाबतीत त्यांनी जानेवारी २०२६ रोजी कर्जत नगर परिषदेला व थेट मंत्रालया पर्यंत तसे निवेदन दिले होते .

मात्र त्यांच्या या निवेदनाकडे पालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाने दुर्लक्ष केले होते . सोशल मीडियावर बातम्या व्हायरल करूनही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने ” साखळी उपोषणाचा ” २५ मे २०२६ पासून पवित्रा घेऊन लोक. टिळक चौकात आंदोलनाला सुरुवात  केली होती .

 याबाबतीत कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पुष्पा दगडे , उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील व इतर परिवर्तन विकास आघाडीचे नगरसेवकांनी सदर उपोषणस्थळी भेट देऊन लेखी आश्वासन देऊन भिसेगाव येथील स. नं. ५३, ५२ क, ५२ ड, ५२ अ मधून जाणारा विकास योजना अंतर्गत सदरचा रस्त्या लगतचा बराचसा भाग हा नगर परिषद मार्फत झालेला असून , उर्वरित रस्ता बाबतची कार्यवाही लवकरच नगर परिषदेच्या माध्यमातून करणेत येईल , व सदरचा रस्ता मुख्य रस्त्यास जोडणेबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्यात येईल. यासाठी पुढील दहा दिवसाच्या आत मा. तहसीलदार – कर्जत यांचेकडे ना-हरकत परवानगी करिता प्रस्ताव सादर करणेत येईल . असे लेखी आश्वासनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने पुकारलेले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले . या आंदोलनाला ” यश ” आले असून ” देर है दुरुस्त है ” प्रमाणे नगर परिषद प्रशासनाने त्यांच्या मागणीला न्याय दिला आहे .

          मात्र खेदाची बाब म्हणजे वाहतुकीला अडथळा होणाऱ्या नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे शहर अध्यक्ष – ॲड . भाऊसाहेब मोरे , सचिव – दिलीप बुंधाटे व इतर पदाधिकारी यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला . या लक्षणीय उपोषणाला अनेक संघटनांनी , नागरिकांनी जाहीर पाठिंबा दर्शवला होता .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!