Uncategorized

…..” सामाजिक कार्यात अग्रेसर राहून , सर्वांनाच मदतीचा हात देणारा , सर्वांचा बंधू – गुरव नंदू “……

कर्जत दहिवली प्रभागातील " सर्वांच्याच मुखातील " एक विश्वसनीय नाव !

” समाज सेवा – हिच ईश्वर सेवा ” असे अलौकिक कार्य…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” समाज सेवा हिच ईश्वर सेवा ” आहे , अशी गाठ मनाशी बांधून , सामाजिक कार्यात अग्रेसर राहून , सर्वांनाच मदतीचा हात देऊन ” अलौकिक कार्य ” करणारा , कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील ” सर्वांच्याच मुखातील ” एक विश्वसनीय नाव म्हणजे ” सर्वांचा बंधू – गुरव नंदू ” हे नाव डोळ्यासमोर येते .

         कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील गुरव आळी येथील रहाणारे ” नंदू गुरव ” ९९ टक्के ” समाजकारण ” व फक्त १ टक्का ” राजकारण ” करून आपला ठसा उमटविणारे ” सेवेकरी ” आहेत . गरिबीत दिवस काढल्याने त्यांना सर्वांचीच ” कळकळ ” असते , म्हणूनच सर्व कार्यात मदतीची जाण ठेवून ते सर्वांच्याच पुढे असतात . त्यांचे जीवन म्हणजे एक ” संघर्षमय ” जीवनच म्हणावे लागेल . नंदू गुरव यांचे वडिल ” गजानन ” हे ते सहा महिन्यांचे असतानाच वारले , त्यामुळे वडिलांचे ” छत्र ” हरविल्यावर त्यांच्या आईने खूपच धिटाइने ” काबाड कष्ट ” करून चार बहिणींना व त्यांना शिक्षण देवून मोठे केले . माझी आईच ” सर्वस्व ” असल्याचे असे भावनात्मक शब्द नंदू गुरव नेहमीच बोलून दाखवतात .

             आजपर्यंत त्यांनी जेष्ठ महिला वर्ग , निराधार महिला , अपंग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान , श्रावण बाळ योजना , पेन्शन तसेच अपंग व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत . प्रसंगी स्वतः पैसे खर्च करून त्यांना शासनाच्या कार्यालयात नेले आहे . दहिवली गावातील पाणी प्रश्न , विजेची समस्या , किंवा सार्वजनिक शौचालय असो , आरोग्य स्वच्छता मोहीम असो नेहमीच मोर्चे – उपोषणे – निवेदन देण्यास व कर्जत नगरपरिषदेमध्ये पाठपुरावा करून सर्व सामान्य नागरिकाला न्याय मिळवून दिला आहे . ” गुरव आळी – दहिवली ” असे प्रभागाचे नामकरण करण्यासाठी देखील त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत . कोरोना काळात देखील त्यांनी लसीकरण – फवारणी करणे , आजारी नागरिकांना जेवणाचा डबा , औषधे तसेच इतर दैनंदिन उपयोगी वस्तू घरपोच करून बहुमूल्य सामाजिक कार्य केले , म्हणूनच त्यांना पालिका प्रशासन व अनेक संघटनांनी तसेच गुरव समाजाने ” कोरोना योद्धा ” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे . दहिवली गावातील गुरव समाजाचा किंवा इतर कोणत्याही समाजाचा नागरिक आजारी असल्यास त्याला दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत करणे , इतर सर्व समस्यात , कार्यात ते मनापासून सहकार्य करतात , दहिवली प्रभागात वीज – पाणी – गटार – रस्ते – सार्वजनिक शौचालय – या नागरी समस्या त्याचप्रमाणे रेशन कार्ड – उत्पन्नाचा दाखला – जातीचा दाखला किंवा इतर दाखले सर्व शासकीय योजनेचा लाभ असो , घरपट्टी – पाणीपट्टी – विजेचे बिल असो किंवा तहसील कार्यालय , नगरपरिषद मध्ये , प्रांत आफिस , तलाठी कार्यालय , उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ” नंदू गुरव ” मनापासून पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या निवारण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात .

             श्रीराम मूर्ती येथील परिसरात देखभाल करतात . ” दहिवली गाव परिसर विचारमंच ” च्या माध्यमातून त्यांचे सहकार्य मोलाचे आहे . राजकारणात देखील स्वर्गीय मा. नगरसेवक प्रदीप दादा शिंदे , माजी आमदार सुरेश भाऊ लाड , आमदार महेंद्र शेठ थोरवे असे त्यांनी राजकीय पातळीवर काम करत त्यांचा विजय संपादन केला आहे . अखेर ” समाज कार्यच ” श्रेष्ठ असल्याने ते कुठल्याच पक्षात , पदावर अडकून न रहाता गुरव समाजात देखील समाज बांधव म्हणून काम करतात .

            महाराष्ट्राचे आराध्य दैवत ” छत्रपती शिवाजी महाराज ” व भारतीय घटनेचे शिल्पकार ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नंदू गुरव हे सामाजिक कार्यात करत असलेले ” बहुमूल्य – निस्वार्थ ” कार्य हे खरच वाखानण्याजोगे असून कर्जत मधील दहिवली गावातील गुरव समाजा बरोबरच ते सर्वांचेच सामाजिक जीवनात ” तारणहार ” आहेत . त्यांच्या या बहुमूल्य सामाजिक कार्यात त्यांची पत्नी सौ. रुची या ” सावली ” सारखी त्यांच्या मागे कायम ” स्फूर्तिदायक ” उभ्या असतात . आपल्या ” गुरू माऊली आइंची ” सेवा करून त्यांचे ” आशीर्वाद ” पाठीशी असल्यानेच मला ” प्रेरणा ” मिळते , असे सांगत ” आई ताराबाई ” यांचा ८१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात नंदू यांनी साजरा करून ” याची देही – याची डोळा ” त्यांना स्वर्गाची प्राप्ती मिळणार , हे म्हणणे वावगे ठरणार नाही . रविवार दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी ” श्री नंदकुमार गजानन गुरव ” यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचे आयुष्य उदंड होवो , त्यांना सामाजिक कार्य करण्यास बळ मिळो , त्यांचे जीवन आरोग्यदायी जावो , हिच ईश्वर चरणी प्रार्थना व खूप खूप शुभेच्छा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!