……” भिसेगाव येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा “…….
श्री हनुमान मंदिरात विविध " धार्मिक " कार्यक्रम संपन्न !

मंदिरात अनेक ” भाविक – भक्तांनी ” घेतले दर्शन……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागात ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी ” श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ” हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्कृती व परंपरागत जपणारे गाव ही भिसेगावची ओळख. या परंपरेला साजेसे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यानिमित्ताने श्री हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम होताना भिसेगाव महिला मंडळ यांनी पहाटे ” काकड आरती ” करुन या उत्सवास प्रारंभ केला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. संध्याकाळी परंपरागत पध्दतीने भजनाच्या , टाळ व मृदूंगाच्या तालावर पालखी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने कर्जत न.प.च्या नगराध्यक्ष मा.सौ.पुष्पाताई दगडे, नगरसेवक मा. श्री. विजय हजारे यांना सन्मानित करण्यात आले. वादन क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करुन सुवर्णपदक मिळविणारा कु .यश शरद हजारे याचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यानिमित्त प्रेमनाथ गोसावी सर, राजेंद्र बोराडे सर , पत्रकार सुभाष सोनावणे , सामाजिक कार्यकर्ते राकेश देशमुख , हनुमान भक्त संदीप वसंत हजारे , कौशिक दिसले, तसेच पंढरीनाथ बोराडे , प्रभाकर हजारे , महिला मंडळ भिसेगाव प्रतिनिधी यांनाही सन्मानित करण्यात आले.

हा जन्मोत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी भिसेगावचे पोलीस पाटील श्री.संजय बबन हजारे , श्री हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष सुरेश भरकले , खजिनदार नारायण जुनघरे , उमेश काठावले , यांनी मेहनत घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने हा धार्मिक सोहळा आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.




