Uncategorized

…..” जिल्हा नियोजन समिती (DPC) अंतर्गत कर्जत नगर परिषदेला नागरी सुविधा आणि शहर विकासासाठी निधी मंजूर “……

खासदार " सुनील तटकरे " यांचे नियोजन व पुढाकाराने " १ कोटी ८९ लाख ९० हजार " रुपयांचा निधी मंजूर !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ” जिल्हाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे ” यांची विकास कामांसाठी मागणी मंजूर…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

रायगडचे खासदार ” सुनील तटकरे ” यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती (DPC) अंतर्गत कर्जत नगरपरिषदेला १ कोटी ८९ लाख ९० हजार रुपये इतका निधी ” नागरी सुविधा आणि शहर विकासासाठी ” मंजूर झाले असल्याने कर्जत नगर परिषद हद्दीतील प्रभागावर हा निधी वापरला जाणार असून विकास कामे होणार आहेत . स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्या मागणी नुसार हा विकास निधी खासदार ” सुनील तटकरे ” यांनी मंजूर केला आहे . 

         

कर्जत नगर परिषदेवर कर्जत परिवर्तन विकास आघाडीची एकहाती निर्विवाद सत्ता निवडून आली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या थेट नगराध्यक्षा ” सौ पुष्पाताई दगडे ” तर शिवसेना ठाकरे गटाचे उपनगराध्यक्ष ” संतोष दादा पाटील ” यांच्या माध्यमातून प्रभागात विकास साधला जात आहे . 

         सदरील १.८९ कोटी रुपयांचा विकास निधीत मंजूर कामांमध्ये १) सप्तश्रृंगी अपार्टमेंट गार्डन विकसित करणे – 9.99 लक्ष , २) गजानन अपार्टमेंट ते भूतावले घरापर्यंत गटार करणे – 9.99 लक्ष , ३) छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील गटारावर स्लॅब टाकणे – 9.99 लक्ष , ४) मुद्रे येथील नेमीनाथ हाईट ते रेव्हेन्यू कॉलनी रस्ता व गटार करणे – 15.00 लक्ष , ५) मोहिनी सदन समोरील रस्ता करणे – 9.99 लक्ष , ६) प्रभाग क्र. 4 मधील बंधिस्त गटार बांधकाम करणे – 9.99 लक्ष , ७) भिसेगाव मुख्य रस्ता ते श्रीअंबे भवानी माता मंदिर रस्ता करणे – 20.00 लक्ष , ८) प्रभाग क्र. 6 मधील रस्ते व गटार करणे – 9.99 लक्ष , ९) प्रभाग क्र. 7 मधील बंधिस्त गटारे बांधकाम करणे – 15.00 लक्ष , १०) दहिवली पाटील आळी येथील दिपेश सोलंकी घरा समोरील रस्ता करणे – 9.99 लक्ष , ११) आकुर्ले बौद्धवस्ती येथे सभागृह बांधणे – 20.00 लक्ष , १२) गुंडगे येथे सभागृह बांधणे – 20.00 लक्ष , १३) गुंडगे सोमजाई मंदिर रोडवरील गार्डन विकसित करणे – 9.99 लक्ष , १४) दहिवली मधील उद्यान विकसित करणे – 9.99 लक्ष , १५) दहिवली मेढी घर ते कलावती मंदिर रस्ता करणे – 9.99 लक्ष , आदी विकास कामांसाठी निधी वापरला जाणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!