……” कर्जत तालुक्यातील ठेकेदारांची शेकडो कोटींची विकास कामांची बिले थकीत “……
ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष " राहुलजी डाळींबकर " यांचा " आमरण उपोषणाचा " ईशारा !

निधी मिळवून देण्यासाठी ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांना दिले निवेदन…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
गेली ३ वर्षे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागासहित शहरातील विकासकामे करून तालुक्याचा ” चेहरा मोहरा ” बदलणाऱ्या ठेकेदारांनी केलेल्या विकास कामांची ” शेकडो कोटींची ” बिले प्रलंबित असल्याने कर्जत तालुक्यातील ठेकेदारांवर बिलांची रक्कम न मिळाल्याने ” उपासमारीची ” वेळ आली आहे . विकास कामांसाठी घेतलेले कर्ज व त्याचे व्याज देखील वाढत असल्याने गेली ३ वर्षे प्रयत्न करूनही बिलांची रक्कम मिळत नसल्याने शासनाचे ” डोळे ” उघडण्यासाठी कर्जत तालुका ठेकेदार संघटनेने ” आमरण उपोषणाचा ” मार्ग पत्करला असून २५ मार्च २०२६ पर्यंत बिलांची रक्कम मिळण्याची ते प्रतीक्षा करणार आहेत .
कर्जत तालुक्यातील आदिवासी उप योजना अंतर्गत साधारणतः एकशे पंचवीस कोटी , ट्रायबल मधील कामांची एकशे नव्वद कोटी तसेच विविध हेड खाली साधारणतः पन्नास कोटी इतक्या रक्कमेची बिले प्रलंबित असून मागील दीड वर्षात ठेकेदारांना एकही रुपयाचे बील मिळाले नाही. त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक स्तिथी खालवली आहे. बँका मधून घेतलेल्या कर्जाचे ” व्याज ” वाढत आहे. मटेरियल सप्लायर्स यांनी ” उधारी ” साठी तगादा लावला आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत केलेल्या कामांची बिले मिळाली नाहीत , तर ठेकेदारांना ” आत्महत्ते ” शिवाय पर्याय उरणार नाही, अशी परिस्थिती दिसत आहे .
याबाबतीत कर्जत तालुका ठेकेदार संघटनेने कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांची भेट घेऊन विकास कामांची प्रलंबित बिले मिळण्यासाठी निवेदन दिले आहे . जर २४ मार्च पर्यंत विकास कामाची रक्कम बिले मिळाली नाहीत , तर कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष ” राहुलजी डाळींबकर ” हे गुरुवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०. ३० वाजले पासून कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ( pwd ) कार्यालयाचे आवारात बेमुदत ” आमरण उपोषणास ” बसणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला असून त्यांचे सोबत इतर सदस्य देखील लाक्षणिक उपोषण करणार आहेंत . यासंदर्भात आमरण उपोषणाचे निवेदन १) मा. अधीक्षक अभियंता, रायगड सा बां मंडळ. कोकण भवन , २) मा. कार्यकारी अभियंता सा बां विभाग पनवेल , ३) मा. तहसीलदार कर्जत , ४) मा. उपविभागीय अभियंता सा बां उपविभाग कर्जत , ५) मा. पोलीस निरीक्षक, कर्जत पोलीस स्टेशन यांना दिले आहेत असे ठेकेदार संघटनेने कर्जत तालुका सेक्रेटरी उदय दादा पाटील यांनी सांगितले आहे . यावेळी ठेकेदार संघटनेचे सर्व सभासद व ठेकेदार उपस्थित होते.
त्यामुळे ठेकेदारांच्या या गंभीर प्रश्नाकडे कर्जत मतदार संघांचे आमदार महेंद्रशेठ थोरवे हे या बाबत वैयक्तिक लक्ष घालून ठेकेदारांना निधी मिळवून देण्यासाठी यशस्वी ठरतात ? की कसे , याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.




