Uncategorized

….” ॐ कार प्राथमिक विद्यालय शेलु – बांधिवली येथे स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न “…..

विविध " क्रिडा - वकृत्व - निबंध - चित्रकला " स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

ॐकार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ” श्री . प्रमोदजी दगडूशेठ मोरे ” यांची प्रमुख उपस्थिती…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील ” ॐकार प्राथमिक विद्यालय ” शेलु – बांधिवली येथे शालेय विविध क्रिडा व विविधांगी स्पर्धेचा पारितोषीक वितरण समारंभ मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या क्रार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ” ॐकार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रमोदजी दगडूशेठ मोरे ” यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शरीर , बुद्धीच्या सर्वांगीण विकासासाठी या विविध स्पर्धा महत्वाच्या असून त्यातून विद्यार्थ्यांना ” प्रेरणा ” मिळते , तसेच उद्याची भावी पिढी घडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांदयावर असून त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य संस्थेच्या वतीने केले जाईल , असे प्रतिपादन अध्यक्ष श्री. प्रमोदजी दगडूशेठ मोरे यांनी केले.

        याप्रसंगी विविध ” क्रिडा स्पर्धा , वकृत्व स्पर्धा , निबंध , चित्रकला ” आदी स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले . शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना ” स्नेहभोजन ” याप्रसंगी देण्यात आले.

          हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी , प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा ” पारितोषिक वितरण सोहळा ” यशस्वी झाला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!