” आधार असंघटित जनरल कामगार यूनियन रिक्षा स्टँडचा ” प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा !
" छत्रपती शिवाजी महाराज " यांच्या जयंती निमित्ताने रिक्षा युनियनची केलेली स्थापना.....

नगराध्यक्षा ” सौ पुष्पाताई दगडे ” यांनी उपस्थित रहात दिल्या शुभेच्छा…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
गत वर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत , कुळवाडी भूषण ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ” आधार असंघटित जनरल कामगार यूनियनने ” कर्जत जुने एस टी स्टँड बाजूला असलेल्या नागरिक , रेल्वे प्रवासी , परिसरातील ग्रामस्थ , कामगार वर्ग , कर्मचारी , खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना , पर्यटक , भाविक , भक्त , यांना सेवा देणारे रिक्षा चालक – मालक यांना एकत्रित आणून असंघटिक रिक्षा धारकांना एकत्रित आणून ” आधार असंघटित जनरल कामगार यूनियन रिक्षा स्टँडची ” स्थापना केली होती . या घटनेला १ वर्ष पूर्ण झाले म्हणून हा प्रथम वर्धापन दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आधार असंघटित जनरल कामगार यूनियनचे अध्यक्ष ॲड . कैलास मोरे , विद्यानंद ओव्हाळ – युनियन सचिव , अरविंद मोरे – स्टॅण्ड अध्यक्ष , मोजम पानसरे – तळप्रमुख , विनय गंगावणे – उप तळप्रमुख , गणेश झोरे – सचिव , रमाकांत देशमुख – खजिनदार , रशिद सय्यद – उपखजिनदार त्याचप्रमाणे अनेक रिक्षा चालक मालक याप्रसंगी उपस्थित होते . प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस युनियन अध्यक्ष ॲड. कैलास मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी उपस्थित रिक्षा संघटनेच्या सदस्यांना त्यांनी मार्गदर्शन केले .
याप्रसंगी कर्जत नगर परिषदेच्या नवनिर्वाचित ” नगराध्यक्षा ” सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे , नगरसेवक अशोक दादा राऊत , पत्रकार सुभाष सोनावणे यांचा शाल – श्रीफळ – पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी रिक्षा संघटनेला शुभेच्छा दिल्या . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी स्थापन केलेल्या या रिक्षा युनियनची पुढील ध्येय धोरणे , योजना , रिक्षा युनियन सदस्यांना सुरक्षा कवच उपक्रम , आदींची माहिती युनियनचे सचिव विद्यानंद ओव्हाळ यांनी सांगून प्रत्येकाने नियमाचे पालन करावे , असे आवाहन रिक्षा सदस्यांना केले .




