…..” श्री वेताळ देवाचा उत्सव २०२६ होणार रविवार १ फेब्रुवारी रोजी “…..
भिसेगाव डोंगरावर होणाऱ्या " अमृतमय सोहळ्यास " सर्वांनी सहभागी व्हा !

देवस्थान कमिटी व ग्रामस्थांचे आमंत्रण…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव ग्रामस्थांचे दैवत ” श्री वेताळ देवस्थानचा ” उत्सव सालाबाद प्रमाणे माघ पौर्णिमे निमित्त रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री वेताळ देवाचा अभिषेक करण्यात येणार आहे . तरी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी, भाविकांनी या अमृतमय सोहळ्यास सहभागी होऊन या सोहळ्याचा, दर्शन कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आमंत्रण देवस्थान कमिटीने केले आहे .
भिसेगाव येथे पश्चिम दिशेला असणाऱ्या डोंगरावर तर पळसदरी येथे जाणाऱ्या रस्त्यावर असणारे हे ” श्री वेताळ देवस्थान ” पूर्वापार असलेले मंदिर आहे . पूर्वी एका उंबराच्या झाडाखाली हे देवस्थान होते , वर जाण्यासाठी डोंगरावर कच्चा रस्ता होता , मात्र कर्जत नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांच्या प्रयत्नाने निधी देऊन येथे डोंगरावर जाण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता , बसण्यास बाकडे , मुलांना खेळण्यास साहित्य बसविण्यात आले आहेत , तर अनेक दानविरांनी मंदिरासाठी लादी , अर्धवट विटांचे बांधकाम वर लोखंडी जाळ्या व पत्र्याचे शेड बनविले आहे . येथे पावसाळ्यात खूपच वारा असल्याने मंदिरात खेळती हवा रहावी म्हणून याठिकाणी अशा प्रकारचे मंदिर आहे . सभोवती वृक्षारोपण केले आहे , तर सौर ऊर्जेवरचे दिवे आहेत , त्यामुळे येथे खूपच प्रसन्न वातावरण असते . हे देवस्थान अत्यंत कडक व जागृत देवस्थान असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे , म्हणूनच येथे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात .
यावर्षी शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ , वेळ रात्री ९ वा ” नवनाथ भजनी मंडळ – भिसेगांव ” यांचे जागरण भजन तर रात्री १०.३० वा. जलाभिषेक, मंत्रजप व आरती तसेच रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी
सकाळी ९ वा. अभिषेक , सायं. ६ वा. हरिपाठ महिला मंडळ, भिसेगांव , रात्री. ७ वा. महाआरती , महाप्रसाद (जेवण) असा दिवसभर कार्यक्रम असून यासाठी ग्रामस्थ व महिला मंडळ भिसेगांव तसेच श्री वेताळ देवस्थान कमिटीने सर्वांना दर्शन , महाआरती , महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आमंत्रण केले आहे .




