…..” मोबाईल चोरीच्या तपासासाठी पोलिसांना आला तिसरा डोळा कामी “…..
कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याची चांगली कामगिरी !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या कर्तबगार पोलिसांनी नुकतेच सीसीटीव्ही फुटेज वरून मोबाईल चोरीचा गुन्हा कौशल्याने तपास करून उघड केले आहे . गु.र. क्र. 09/2026 भा.न्या.सं. कलम 303(2) , नुसार श्री. गणेश कालिदास कवठे, वय 23 वर्ष, व्यवसाय – हॉटेलमध्ये कामगार, राहणार – केतकी पाडा, दहिसर पूर्व , मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ , वेळ १३.०० वा. ते १४.०० वा. पर्यंत कर्जत रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक वर , स्टेशन मास्तर जवळील बाकड्यावर झोपी गेले असताना , कोणीतरी अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या पॅन्टच्या डाव्या खिशातून मोबाईल फोन काढून नेला. याबाबतीत गणेश कवठे यांनी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती . सदरचा मोबाईल 15000/- रु. किंमतीचा , आकाशी रंगाचा टेक्नो कंपनीचा ,मॉडेल नंबर TECNO BF7, असा जुना वापरता मोबाईल होता .
मा. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई , मा.पोलीस उपायुक्त, मध्य परिमंडळ भायखळा, लोहमार्ग मुंबई व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री तानाजी खाडे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील ” सीसीटीव्ही ” फुटेज संकलित करून त्यातील संशयित आरोपीचे तपासात गुप्त बातमीदारा मार्फत माहितीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा इंदिरानगर, दहिवली तालुका- कर्जत येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन चौकशीसाठी गुन्हे तपास पथक कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणे येथे घेऊन आल्यानंतर त्याच्या अंगझडती मध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आला आहे. तसेच सदरचा गुन्हा त्याने स्वतःच केला असल्याची कबुली दिल्याने त्याला नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरच्या आरोपी वरती यापूर्वी कर्जत शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 117/ 2008 भादंवि कलम 379 आणि खालापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 13 /2024 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदरचा गुन्हा तपासी अमलदार पो हवा/3290 प्रवीण बी. कांबळे , पोलीस हवालदार 875 राजेंद्र बागुल , तपास पथक पो. उपनिरीक्षक प्रविण कड, पोलीस हवालदार / 3290 प्रवीण कांबळे , पोलीस हवालदार / 2756 प्रशांत गोडे , पोलीस नाईक 668 सचिन चव्हाण , पोलीस शिपाई 553 नितीन मोहिते , पोलीस शिपाई 882 प्रल्हाद चोरमले , पोलीस शिपाई 1752 अक्षय पेरणेकर , पोलीस शिपाई – निकेश तुरडे, पोलीस शिपाई 2022 जाधव , कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी या तपास कार्यात भाग घेतला .
कर्जत रेल्वे पोलीस ठाणे – मुंबई ,चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे साहेब यांनी पोलीस जवानांच्या केलेल्या चांगली कामगिरी बद्दल कौतुक करून शाबासकीची थाप दिली आहे .



