…..” मंगेश आप्पा काळोखे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या “…..
कर्जतमध्ये " शिवसेनेचा " रस्त्यावर उतरून " संतप्त जन आक्रोश " मोर्चा !

कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक ” उमेश पाटील ” यांना दिले निवेदन….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
खोपोलीचे माजी नगरसेवक तथा नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती ” मंगेश आप्पा काळोखे ” यांची खोपोली येथे २६ डिसेंबर २०२५ रोजी भर दिवसा सकाळी रस्त्यावर कोयते – कुऱ्हाड यांनी २६ वार करून त्यांची क्रूर हत्या करण्यात आली . सदरची हत्या राजकीय वैमन्यासातून रविंद्र देवकर सहित १२ जणांनी २० लाखांची सुपारी देऊन करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करून संबंधित आरोपींना ” फाशीची शिक्षा ” झाली पाहिजे , म्हणून मोर्चे काढण्यात आले . सदरच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांची नावे समोर आल्याने याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले . या दोन आरोपींना अद्यापी पकडण्यात आले नसून उर्वरित १३ आरोपींना खोपोली पोलिसांनी रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली असून अजून उर्वरित तपास सुरू आहे .
याच पार्श्वभूमीवर कर्जत मध्ये शिवसेनेच्या वतीने लोकमान्य टिळक चौकात जमून या निंदनीय घटनेचा तीव्र संताप व्यक्त करून या हत्येत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे , सदरचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून जलद गतीने या हत्येचा उलगडा होऊन काळोखे कुटुंबीयांना न्याय मिळावा , अशी देखील संतप्त मागणी करण्यात आली .
राजकारणात जय – पराजय होतच राहतो , पराभवाने खचून न जाता अजून जोमाने काम करून आपले अस्तित्व सिद्ध करायचे असते , मात्र रविंद्र देवकर यांना निवडणुकीत झालेली हार सहन झाली नाही . मंगेश काळोखे हे खोपोली नगर पालिकेत १ वेळा तर त्यांची पत्नी मानसी काळोखे या २ वेळा त्यांच्या प्रभागातून निवडून आल्या होत्या , यासाठी त्यांचा ” राजकीय अस्त ” त्यांना अश्या प्रकारे हत्या करून संपविणे , हि निंदनीय घटना असल्यानेच संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेची हळहळ व्यक्त होत आहे . यासाठी २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी मुलींना शाळेत सोडून घरी परतत असलेल्या मंगेश काळोखे यांची झालेल्या हत्येने व काळोखे कुटुंबीयांचे छत्र हरवल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे .
सदरच्या निषेध मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , संघटक शिवराम बदे , सुरेश दादा टोकरे , तालुका प्रमुख सुदाम दादा पवाळी , मनोहर दादा थोरवे , प्रसाद थोरवे , नगरसेवक संकेत भासे , अमर मिसाळ , नदीम खान , महिला आघाडीच्या शितोळे , शहासने , यांसह मोठ्या संख्येने शिवसेना – युवासेना – महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते .सदरचे निवेदन कर्जत पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना देण्यात आले .
कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक ” उमेश पाटील ” यांना दिले निवेदन….


