Uncategorized

सदर मयत इसमाचा ” शोध ” लागण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे !

" कर्जत पोलीस ठाण्याचे " सर्वांना आवाहन.....

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

 

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या भिसेगाव गेट येथील ” बिकानेर स्वीट मार्ट ” च्या मागील इमारतीच्या गल्लीत एक अनोळखी इसम मयत झाला असून त्याची ओळख पटली नसल्याने कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अन्वेषण अधिकारी एस. एस. रोकडे – सहा. पोलीस उपनिरीक्षक कर्जत पोलीस ठाणे यांनी सदरच्या अनोळख्या इसमाची माहिती मिळाल्यास कर्जत पोलीस ठाण्यात येवून सांगावे , असे आवाहन केले आहे .

कर्जत पोलीस ठाणे अ. मू. रजि. नं. ८१/२०२५ भारतीय नागरीक सूरक्षा संहिता कलम १९४ मधील अनोळखी मयताचा रजि. नं. -८१/२०२५ , बी. एन. एस. एस.१९४ , खबर देणार – राहून नारायण राठोड , पो.शि./१४५० नेमणूक कर्जत पोलीस ठाणे दि.२८ डिसेंबर २०२५ , १३:३० वा. मौजे भिसेगाव गावचे हद्दीत बिकानेर स्विट मार्टचे बाजूला असलेल्या बिल्डिंगच्या पाठीमागील गल्लीत दि.२८ डिसेंबर २०२५ रोजी १७:१८ वाजता किंवा त्यापूर्वी एक अनोळखी ३० ते ३५ वषे वय असलेला , उंची ५ फूट सडपातळ बांधा , केस वाढलेले, हणूवटीवर बारीक वाढलेली दाढी , दात पूढे आलेले , मळकटलेला पाढ-या रंगाचा फूल बाहयाचा शर्ट व खाकी रंगाची फूल पॅन्ट घातलेला , अशा वर्णनाचा मयताचे मरणाचे कारण हृदय विकाराच्या झटक्याने झालेला आढळून आला आहे .

वरिल तारखेस वेळी व ठिकाणी यातील अनोळखी फिरस्ता हा मौजे भिसेगाव हददीतील बिकानेर स्विट मार्टच्या बाजूला असलेल्या बिन्डिंगच्या पाठिमागिल गल्लीमध्ये कोणत्यातरी अज्ञात कारणाने मयत झाला आहे . म्हणून अशा वर्णनाच्या ईसमाचा शोध घेणे कामी सदरच्या इसमाची काही माहिती मिळून आल्यास कर्जत पोलीस ठाणे 02148222100 , किंवा तपास करणारे अधिकारी सहा. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. रोकडे यांचे मोबाईल नं 9604385209 यावर संपर्क करावा , असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एस. रोकडे – सहा. पोलीस उपनिरीक्षक कर्जत पोलीस ठाणे यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!