…..” पथनाट्याच्या माध्यमातून कर्जतमध्ये एचआयव्ही / एड्स जनजागृती मोहीम “…..
शाहीर " आलम रमजान पटवेगार " - सांगली कला पथकाचा सहभाग !

कर्जत वैद्यकीय अधिक्षक ” डॉ. विजय मस्कर ” यांचा पुढाकार…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” असुरक्षित लैंगिक संबंध , एचआयव्ही संसर्गित व्यक्तीची सुई व सिरिंजचा वापर , संसर्गित रक्त देण्यात आल्यास तसेच एचआयव्ही बाधित पालकांकडून होणाऱ्या बाळाला संसर्ग होण्याची शक्यता ” यामुळे एड्स ची बाधा होऊन एके काळी अनेक तरुण पिढी , अनेकांची संसारे उध्वस्त झाल्याचा इतिहास समोर असताना आताची भावी पिढी या भयानक आजारापासून बळी न पडता ” कोसोदूर ” रहाण्यासाठी शासन – प्रशासनाच्या वतीने आजही जोरदार जनजागृती सुरू आहे . रायगड अलिबाग, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा – मुंबई येथील प्रकल्प संचालक तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या आदेशा नुसार जिल्ह्यात एचआयव्ही / एड्स जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे . त्याचाच एक भाग म्हणून उपजिल्हा रुग्णालय कर्जतचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता कर्जतमध्ये रेल्वे स्थानका बाहेर ” शाहीर आलम रमजान पटवेगार – बागणीकर , सांगली ” कला पथक व त्यांच्या सर्व टीम ने लोकगीतांच्या माध्यमातून ” एड्स ” बाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत कर्जतमध्ये शाहीर आलम रमजान पटवेगार – बागणीकर , सांगली यांच्या पथनाट्याद्वारे एचआयव्ही / एड्स म्हणजे काय ? त्याची कारणे , लक्षणे , समज गैरसमज, २०१७ चा कायदा , आयसीटीसी केंद्रे , टोल फ्री क्रमांक १०९७ तसेच ॲप याविषयी लोकगीतांच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली. असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीचीच सुई व सिरिंजचा वापर, संसर्गित रक्त देण्यात आल्यास तसेच एचआयव्ही बाधित पालकांकडून होणाऱ्या बाळाला संसर्ग होण्याची शक्यता याचा उलगडा करण्यात आला . म्हणूनच प्रत्येक नागरिकांनी व विशेषतः गरोदर मातांनी शासकीय दवाखान्यातील आयसीटीसी समुपदेशन व तपासणी केंद्रातून एचआयव्हीची तपासणी करून घ्यावी, नेहमी नवीन सुईचा वापर करावा, रक्ताची गरज भासल्यास प्रमाणित रक्तपेढीतूनच रक्त घ्यावे , तसेच एचआयव्ही संसर्ग आढळल्यास मोफत उपचार घ्यावेत, असे आवाहन पहाडी आवाजात ” शाहीर आलम रमजान पटवेगार – सांगली कला पथक यांनी गीत गायनातून सादरीकरण केले .
यावेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय मस्के – प्रयोगशाळा तंत्रज्ञ , विजय पवार – आयसीटीसी समुपदेशक आदी कार्यक्रम ठिकाणी उपस्थित होते .
कर्जत वैद्यकीय अधिक्षक ” डॉ. विजय मस्कर ” यांचा पुढाकार…..

