…..” अखेर जनतेचा विश्वास जिंकला “….
कर्जत बुद्धनगर मध्ये राष्ट्रवादीच्या " सौ. सुमिता गायकवाड " यांच्या विजयाने नवा बदल - नवा चेहरा !

युवा नेते ” योगेश आप्पा गायकवाड ” यांचे डावपेच सफल……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

राजकारणात ” राजयोग ” खूप महत्वाचा आहे . तो जर तुमच्या ” नशिबात ” असेल तर सर्व योग जुळून येतात , व निसर्गातील सर्व ” शक्ती ” तुमच्या पाठीशी उभी राहून तुम्ही ” यशस्वी ” होता , तुमच्या मेहनतीला फळ येते . कर्जत नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ कर्जत बुद्ध नगर येथील सौ. सुमिता योगेश आप्पा गायकवाड यांनी मतदारांचा विश्वास जिंकून या प्रभागात ” न भूतो न भविष्यती ” असा ” विजयी ” संपादन करून ” विक्रमच ” केला आहे . महायुतीतील आर पी आय पक्षाची निर्विवाद सत्ता असताना प्रभागात पाच वर्षे मतदारांची केलेली कामे , सुनियोजित कार्यक्रम , मतदारांना दाखविलेला विश्वास , ” बदल हवा तर चेहरा नवा “, हे महासूत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते योगेश आप्पा गायकवाड यांनी वापरून विजयी खेचून आणला . विशेष म्हणजे येथील परिवर्तन विकास आघाडीचे आख्खे पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने व नगराध्यक्ष पदाला भरभरून मते दिल्याने युवा नेते ” योगेश आप्पा गायकवाड ” यांचे ” अभेद्य नेतृत्व ” सिद्ध झाले आहे .
कर्जत नगर परिषद निवडणुक – २०२५ हि खूपच अटीतटीची झाली . महायुती विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी अशी झालेल्या ” टफ ” लढतीत सर्वांचेच लक्ष प्रभाग क्रमांक ” ४ ” कर्जत बुद्ध नगर येथे लागले होते . या प्रभागात महिला अनुसूचित जाती आरक्षण पडले होते . आर पी आय पक्षाची येथे निर्विवाद ताकद असताना फक्त आपल्या कार्याच्या जोरावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” व ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांनी युवा नेते योगेश आप्पा गायकवाड यांच्या पाठीवर टाकलेल्या उदंड आधारामुळे योगेश आप्पाने हि ” विजयश्री ” खेचून आणण्यात यश मिळवले . कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सौ. सुमिता योगेश आप्पा गायकवाड या उच्चशिक्षित , त्यांचा हसमुख स्वभाव , योगेश आप्पा गायकवाड यांच्या प्रत्येक कार्यात त्यांची ” सावली ” सारखी साथ , मतदारांना दिलेला विश्वास व त्यांची साथ , भविष्यात प्रभागात विकास कार्याची हमी , व आघाडीचे पॉवर फुल नेते तसेच त्यांचे नेतृत्व या जोरावर सौ. सुमिता योगेश गायकवाड यांनी तब्बल ११९४ मते घेऊन ३६१ मतांची आघाडी घेत विजयी संपादन केला .
या ” न भूतो न भविष्यती ” अश्या विजयात प्रभाग क्रमांक ४ मधील कर्जत बुद्ध नगर , विठ्ठल नगर , डेक्कन जिमखाना , पाटील आळी , खाटिक आळी व प्रभागातील इतर भागातील मतदारांनी उदंड साथ दिल्याने ” चला साथ देऊ – प्रभाग घडवू ” , व ” नवा चेहरा – नवा विकास ” या महासुत्राने विजयी घडला असून या माय बाप मतदारांचे , माझ्या कुटुंबातील सदस्यांचे , महिला भगिनींचे व इतर सर्व ज्ञात – अज्ञात शक्तींचे , माझी आई व ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे , भावासारखा मित्रांच्या अथक प्रयत्नाने , घडलेल्या ” विजयी इतिहासामुळे ” मी सर्वांचाच आभारी असून हे आपले ” अमूल्य ऋण ” मी सदैव आपली सेवा करून , प्रभागातील विकास साधून , समस्या सोडवून फेडीन , असे भावनिक मत युवा नेते ” योगेश आप्पा गायकवाड व नवनिर्वाचित नगरसेविका सौ. सुमिता योगेश गायकवाड ” यांनी व्यक्त केले .




