Uncategorized

…..” अब के बार – हमारी सरकार “…..

कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या " निकालाकडे " सर्वांचेच लक्ष !

” विद्यमान आमदार , माजी आमदार ” तर आमदारकीची उमेदवारी लढलेल्या ” नेत्यांचे ” अस्तित्व पणाला……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषदेची सन – २०२५ च्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या २१ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे . हि निवडणूक विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे , माजी आमदार सुरेश भाऊ लाड विरुद्ध आमदारकीची निवडणूक लढलेले मात्र पराभूत झालेले सुधाकर भाऊ घारे , व नितीन दादा सावंत या नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई समजली जाते . त्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या ” पराभवाची झालर ” असल्याने कोण विजयी होतो , व कोण पराभूत ? याकडे आता काही तासांचा अवधी राहिला आहे . ” अब की बार , हमारी सरकार ” , असे जरी नेते म्हणत असले , तरी मतदार राजाने कुणाच्या बाजूने ” कौल ” दिला आहे ? हे मतपेटीत बंदिस्त असून त्याचे उत्तर ” गुलदस्त्यात ” लपलेले आहे .

यावेळी ” नगराध्यक्ष ” पद हे ” ओबीसी महिला ” आरक्षण पडल्याने यंदा सर्वांचीच ” राजकीय गणिते ” चुकली होती . मात्र नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची सून ” डॉ सौ. स्वाती अक्षय लाड ” या भाजप पक्षाकडून महायुतीच्या उमेदवार घोषित झाल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ठाकरे शिवसेना अशी अनपेक्षित कर्जत परिवर्तन विकास आघाडी होऊन नगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला येऊन ३ वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या ” सौ. पुष्पा ताई हरिश्चंद्र दगडे ” या उमेदवार असल्याने हि राजकीय लढाई अटीतटीची झाली होती . शाब्दिक चकमक देखील पहाण्यास मिळाली .

विद्यमान कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” विकास कार्याचा ” आधार या निवडणुकीत असल्याने कर्जत नगर परिषद निवडणुकीत झालेल्या शिवसेना – भाजप – आर पी आय या महायुतीचे नगराध्यक्ष व किती नगरसेवक निवडून येतात , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . तर मागील काळात नगराध्यक्ष पद भूषविलेल्या ठाकरे शिवसेनेच्या व विरोधी पक्ष भूषविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व कित्ती नगरसेवक निवडून येतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . मात्र हे विधानसभा निवडणुकीतील एकमेकांचे विरोधक आताच्या कर्जत नगर परिषद निवडणुकीत कोण विजयी मुद्रेत ” दंड थोपटणार ” हा देखील ” थरार ” पहाण्यास मिळणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!