Uncategorized

…..” कर्जतकरांच्या स्वागताला भर बाजारपेठेत गटारावरील तुटलेली जाळी “……

अपघात होण्याची वाट बघतात का मुख्याधिकारी तानाजी चव्हाण , कर्जतचे वाली !

नागरिकांत ” संतप्त ” प्रतिक्रिया…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद रेल्वे स्थानकाच्या बाहेर नागरिकांच्या स्वागताला रस्त्याच्या मधोमध गटारावरील लोखंडी जाळी दर २ ते ४ महिन्यांनी त्यावरून कर्जत बाजारपेठेतून ६ – ८ व १२ चाकी अवजड वाहनांना बंदी असतानाही तकलादू व क्वालिटी नसलेली जाळी असल्याने लवकरच तुटते . हा भर बाजारपेठेत प्रकार होत असल्याने रहदारीच्या रस्त्यावर चालताना जेष्ठ नागरिक , महिला भगिनी , शाळेतील विद्यार्थी , लोकल पकडायला जाणारे प्रवासी , चालणारे नागरिक , एखादे जनावर त्यात पाय अडकून व एखादे वाहन त्यात पलटून , अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही व असे अपघाताचे प्रकार देखील घडले असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण असून कर्जत नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी एखादा अपघात घडल्यावरच ती गटारावरची जाळी बदलणार का ? अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत .

भर बाजारपेठेत अगदी मधोमध हा चुकीच्या ठिकाणी ” गटार ” असून त्यावरून अवजड वाहने , चार , दोन चाकी व रिक्षा जात असतात . त्यामुळे या महत्त्वपूर्ण गटारावर मजबूत लोखंडाची जाळी बसविणे गरजेचे असताना पालिका प्रशासन यावर तकलादू , लोखंड मजबूत वापरत नसल्याने त्यावरून अवजड वाहने जावून जाळी तुटते . याबाबतीत सोशल मीडियावर फोटो सहित तक्रारी करूनही त्यावर ” मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ” हे ताबडतोब ” ॲक्शन ” घेत नसल्याने त्यात पाय अडकून अथवा गाडी लवंडून अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे .

हि परिस्थिती दर ४ महिन्यांनी दिसून येत असल्याने बाहेरील येणारे प्रवासी , पर्यटक , नागरिकांना हि तुटलेली जाळी न दिसल्यास अपघात होणारच , मग हि जाळी चांगल्या प्रतीची का लावली जात नाही ? कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण याकडे दुर्लक्ष का करत आहेत ? असा संतप्त सवाल कर्जतकर नागरिक करत आहेत . सध्या कर्जत नगर परिषदेवर प्रशासकीय राजवट आहे , तर नुकतीच निवडणूक झाली असून मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या हातातच कारभार आहे . आता हि कधी जाळी बदलणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!