…..” कर्जतमध्ये भाजपाला खिंडार “…..
डॅशिंग नेते " रामदास भाई घरत " यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश !

येणाऱ्या निवडणुकीत ” भगवा ” फडकविण्यासाठी सज्ज व्हा – उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत
शिवसेनेत सर्वांना ” सन्मानाची ” वागणूक देणार – ता. प्रमुख बाजीराव दळवी
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका येऊ घातल्या असल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ” पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी कर्जत तालुक्यात ” भगवा ” फडकविण्यासाठी सुरुवात केली असून आज भारतीय जनता पक्षाला ” खिंडार ” पाडत कशेळे जिल्हा परिषद प्रभागातील ” डॅशिंग नेते रामदास भाई घरत ” ( भाजप सरचिटणीस कर्जत ग्रामीण मंडळ तथा संचालक शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ कर्जत तालुका ) यांच्यासह मोठ्या संख्येने अनेकांनी शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला . त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेकडे ” शुभ मुहूर्त ” लागला असून पक्षाची ताकद उपजिल्हाप्रमुख ” नितीन दादा सावंत ” यांच्या नेतृत्वाखाली, कर्जत तालुका प्रमुख ” बाजीराव दळवी ” यांच्या सहकार्याने दिवसेंदिवस वाढत चालली आहे .
आज शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ” शिवालय ” या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद दादा भोईर , उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत ,भीमसेन बडेकर कर्जत तालुका संपर्कप्रमुख , बाजीराव दळवी कर्जत तालुकाप्रमुख , माधव कोळंबे कर्जत तालुका संघटक , बाबू घारे , पंढरीनाथ राऊत , करुणा बडेकर कर्जत तालुका संघटिका , दशरथ भगत उपतालुकाप्रमुख , निलेश घरत कर्जत शहर प्रमुख , संपत हडप युवासेना कर्जत विधानसभा अधिकारी , प्रमिला बोराडे मा. सरपंच हालिवली ग्रामपंचायत , बाळू सावंत , जगदीश ठाकरे , लक्ष्मण पोसाटे , सुमन लोंगले , सुरेश बोराडे , देवेंद्र खोत , कृष्णा जाधव आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते .
यावेळी आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सर्वांनी ” भगवा ” फडकविण्यासाठी ” सज्ज ” होऊन तयारीला लागा , असा एल्गार उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी उपस्थित शिवसैनिकांना व पदाधिकारी यांना केला . तर कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांनी आज केलेल्या सर्व पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत करून शिवसेना परिवारात सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल , अशी ग्वाही दिली . तर आगामी कर्जत तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अधिक जोमाने काम करून ” भगवा फडकविणार ” असे मत रामदास भाई घरत यांनी व्यक्त केले .
यावेळी कर्जत ता. प्रमुख बाजीराव दळवी यांच्या प्रयत्नाने रामदास भाई घरत यांच्या समवेत समाधान कडू , अशोक हिंदोळे , प्रकाश फाळे , तुषार केवारी , अविनाश केवारी , प्रेम केवारी , राम भगत , निखिल पारधी , प्रतीक घुडे , प्रल्हाद पिंगळे , गणेश तुंगे , प्रथमेश पिंगळे , डॉ सुपे , त्याचप्रमाणे इतर अनेकांनी पक्ष प्रवेश केला . तर माजी कर्जत ता. संघटक बाबू घारे यांच्या प्रयत्नाने पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीतील हेमंत सोनावळे , किरण सोनावळे , धर्मेंद्र सोनावळे , केतन सोनावळे , वीरेन सोनावळे , महेश सोनावळे , प्रकाश जोगळे आदींनी शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला .
येणाऱ्या निवडणुकीत ” भगवा ” फडकविण्यासाठी सज्ज व्हा – उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत 



