….” अभूतपूर्व गर्दीत परिवर्तन विकास आघाडीची सभा कर्जतमध्ये संपन्न “…..
नगराध्यक्ष पदासाठी " पुष्पाताई " उभ्या नसून मी " सुनील तटकरे " उभा आहे म्हणून मला मते द्या !

राष्ट्रवादीचे खासदार ” सुनील तटकरे ” यांची कर्जतकर नागरिकांना भावनिक हाक…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

” महिलांच्या उन्नतीसाठी ” कर्जत नगर परिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी परिवर्तन विकास आघाडी च्या उमेदवार ” सौ. पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे ” या उभ्या नसून मी ” सुनील तटकरे ” उभा आहे , असे समजून मते द्या व परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी ” विजयी ” करून आघाडीचा ” झेंडा ” या कर्जत नगर परिषदेवर डौलाने फडकवा , अशी ” भावनिक हाक ” कर्जतकर नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे धुरंधर नेते खासदार ” सुनील तटकरे ” यांनी कर्जत येथे लोकमान्य टिळक चौकात आयोजित केलेल्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेत दिली . ” अभूतपूर्व गर्दीत ” झालेल्या या सभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती .
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी विचार पिठावर महाराष्ट्राचे महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मान. अजित दादा पवार , प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे , मा. राजिप सदस्य राजू साबळे , रायगड जिल्हाध्यक्ष तथा मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , राजिप चे मा. बांधकाम सभापती बंधू पाटील , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भाई भगत , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , कर्जत ता. अध्यक्ष दिपक भाई श्रीखंडे , कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे , ज्येष्ठ नेते राम शेठ राणे , शेकाप चिटणीस विलास भाई थोरवे , आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेठ सावंत , पंकज पाटील , संघटक बाबू घारे , मोहन ओसवाल , कर्जत ता. प्रमुख बाजीराव दळवी , विधानसभा अध्यक्षा ॲड . पूजा सुर्वे , ता. अध्यक्षा ॲड रंजना धुळे , युवा नेते केतन बेलोसे , ठाकरे सेनेचे सुरेश बोराडे , उमेश आप्पा गायकवाड , राजिप सभापती नारायण डामसे ,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ . पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे , त्याचप्रमाणे परिवर्तन विकास आघाडीचे २१ उमेदवार यावेळी उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की , राष्ट्रवादीची स्थापना होताना मी माझ्या बरोबरच कर्जत विधान सभेची उमेदवारी सुरेश लाड यांना मागितली , असे म्हणत तब्बल २५ वर्षांनी राजिप चे माजी अर्थ बांधकाम सभापती व सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटचे बंधू तथा पुंडलिक पाटील यांची माफी मागितली . त्यांची उमेदवारी डावलून त्यावेळी सुरेश लाड यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी सांगितले . माझे विशेष प्रेम या मतदार संघावर असून २००४ साली सुरेश लाड यांचा पराभव झाला तर मी प्रथम कर्जतला आलो , यावर प्रकाश टाकला .येथील रस्ता रुंदीकरणाचे जनक हे अजित दादा पवार आहेत . येथील आमदार माझा dna काढतात , पण प्रथम त्यांनी dna चा लाँग फॉर्म सांगावे, असा शाळजोडा मारत , माझा dna समाजसेवेचा आहे ,धर्म निरपेक्षपणाचा आहे , असे उत्तर दिले . कोरोना काळात आदिती पालकमंत्री असताना येथील आमदारांनी एक महिला आमदारांना बोललेले शब्द खूपच ” उद्धट व अपमानास्पद ” होते , याची आठवण करून दिली. सुरेश लाड यांना ज्यांनी नाही – नाही ते बोलले , त्या आमदारांचा फोटो मोठा , तर सुरेश लाड यांचा फोटो छोटा , अशी खिल्ली देखील त्यांनी उडवली . हे शहर कला , क्रीडा , पर्यटन शहर आहे , येथील विकास केला तर कुठे आहेत १ हजार करोड रुपयांचा निधी ? यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला . आम्हाला एक संधी द्या , येणाऱ्या काळात भव्य नाट्यगृह उभारणार , इथे पाण्याची सोय करू शकले नाहीत , ती आम्ही करू , भविष्यात जास्त निधी देऊन येथील विकास करणार , असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .
आम्ही युतीचा धर्म पाळला , जर AB फॉर्म सुधाकर घारे यांना दिला असता तर या मतदार संघाचा ” दमदार – आमदार सुधाकर भाऊ घारे ” झाले असते , यावर त्यांनी प्रकाश टाकला . येथील रद्द झालेल्या सर्व रेल्वे गाड्या येणाऱ्या अधिवेशनात मी सुरू करणार , असे सांगत भूमिगत गटारे , स्वच्छ पाणी , भूमिगत वीज , महिला बचत गट भवन उभारणार , हुतात्म्यांची स्मारके इथे दिमाखात उभे करणार , महिलांच्या उन्नतीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले . तर एक महिला उमेदवारांचे शिक्षण काढणाऱ्यांना कित्ती शहाणपण असेल , हे दिसून येते , आज पुष्पाताई उभ्या नसून मी सुनील तटकरेच उभा आहे , असे समजून मला मते द्या व परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून द्या , अशी भावनिक हाक त्यांनी कर्जतकर नागरिकांना दिली . यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष , शेतकरी कामगार पक्ष यांचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले . कर्जतकर नागरिक अभूतपूर्व गर्दीने इथे जमला ते परिवर्तन विकास आघाडीच्या ” विजयाची नांदीच ” असल्याचे त्यांनी सांगून ३ डिसेंबरला मी विजयी रॅलीत येणार , असे सांगितले .




