टॉप न्यूज़

……” आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून किरवली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न “……

किरणभाई गायकवाड यांचा पुढाकार !

किरवली बौद्ध वस्तीतील अनेक ग्रामस्थ व महिला उपस्थित…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत – खालापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय ” महेंद्र शेठ थोरवे ” यांचे किरवली ग्रामपंचायतमधील अतिशय जवळचे समजले जाणारे निष्ठावंत व कट्टर ” किरणभाई गायकवाड ” यांच्या पुढाकाराने होऊ घातलेल्या किरवली बौद्धवस्ती अंतर्गत रस्ते व गटारे या विकास कामांचे भूमिपूजन शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 

        सदर कार्यक्रमास किरवली गावचे शिवसेना शाखाप्रमुख जनार्धन बडेकर, भारतीय बौद्ध महासभा कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाशजी गायकवाड, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील ॲड. गौतम गायकवाड, बोधिसत्व बुद्ध विहार कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गायकवाड , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड गटाचे युवा कार्यकर्ते सागरभाई गायकवाड, विशाल गायकवाड, रोशन गायकवाड, शरद गायकवाड, नितीन गायकवाड, कल्पेश गायकवाड, शोर्य गायकवाड, शरद पवार, विजय पवार, बोधिसत्व बुद्ध विहार कमिटीच्या सचिव विजया सोनवणे, सुशीला गायकवाड, कुसुम जाधव, रंजना गायकवाड, हिराबाई गायकवाड, अमिता गायकवाड, मालती गायकवाड, रचना गायकवाड, माया गायकवाड, मीनल गायकवाड, मनाली गायकवाड, साक्षी जाधव इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         सदर भूमिपूजना प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना शरद पवार म्हणाले की , सर्व ग्रामस्थांनी आपापले पक्ष, संघटना बाजूला ठेवून विकास कामांना प्राधान्य द्यावे व विकास कामे होत असतील तर त्याच्या आड येऊ नये. तर प्रकाश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सदर गटारांची व रस्त्यांची नितांत आवश्यकता होती , कारण सदर गटारे व रस्ते पूर्णपणे निकामी झाली होती , परंतु अनेक वर्षे ही कामे झाली नाहीत, म्हणून आज झालेल्या भूमिपूजनाने त्यांनी आनंद व्यक्त केला व किरण गायकवाड यांचे अभिनंदन केले.

        युवा कार्यकर्ते सागरभाई गायकवाड यांनी आपल्या मनोगतात किरवली बौद्ध वस्तीत होत असलेल्या विकासकामांसाठी इंजिनियर किरणभाई गायकवाड यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे नमूद केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल इंजिनियर किरणभाई गायकवाड यांनी किरवली ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!