…..” महिला भगिनींच्या भरकटलेल्या सामाजिक जीवनात साथ देणारा आधार व मार्ग दाखविणारा आरसा , ॲड. सुषमा ढाकणे “……
उल्लेखनीय कार्याबद्दल " राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान " पुरस्काराने सन्मानित !

हा ” सन्मान ” माझी जबाबदारी वाढवणारा व ” प्रेरणा ” देणारा – ॲड. सुषमा ढाकणे
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
रायगड सहित कर्जत खालापूर तालुक्यात ” तन – मन – धन , वेळ व दिलासा ” देऊन वंचित – शोषित – पीडित , महिला भगिनींच्या भरकटलेल्या जीवनाला योग्य मार्ग दाखवून खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रगतीचा व सक्षमीकरणाचा ” आधार व आरसा ” बनणाऱ्या प्रेरणादायी नेतृत्व ” ॲड. सुषमा ढाकणे ” यांना नुकताच मुंबई येथे मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन आझाद मैदान , येथे शनिवार दिनांक १३ जून २०२६ , संध्याकाळी ५-३० वा . ” कार्य दर्पण युट्युब चॅनल व महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था ” यांच्या संयुक्त विद्यमाने ” राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

हा सर्वोत्तम पुरस्कार ॲड सुषमा ढाकणे यांना प्रदान करताना व्यासपीठावर मा. कौशल इनामदार (संगीतकार) , मा. सुनिल अगवणे, आय. आर.एस ( अतिरिक्त आयुक्त, आयकर विभाग) , मा. डॉ. आबिद सय्यद ( चेअरमेन, बेन्ज हॉस्पिटल, मुंबई) , प्रमुख अतिथी – मा.डॉ. अमजद खान पठाण ( कर्करोग शास्त्रज्ञ तथा विश्वशांती दूत) ,मा. डॉ. पुर्णिमा सुर्वे ( प्राचार्य, शिवाजीराव एस. जोंधळे इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँन्ड रिसर्च, आसनगांव) , मा. डॉ. जे.के. महाडीक (या. विशेष अधिक्षक, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन), सन्मा. अतिथी – मा. उत्तमराव तरकसे (आसरोडकर) क्राईम ब्रान्च पोलिस अधिकारी, जेष्ठ कवी आणि साहित्यिक विचारवंत) , मा. सायली पावसकर (थिएटर आफ रेलेवंस अभ्यासक, लेखिका आणि आंतरराष्ट्रीय रंगकर्मी), मा. पंकज पाडाळे (लोककला, लोकनृत्य अभ्यासक व संशोधक, नृत्य नाट्य दिग्दर्शक) , आदी राज्यस्तरीय मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते हा सर्वोत्तम पुरस्कार ” ॲड. सुषमा ढाकणे ” यांना प्रदान करण्यात आला .
सदरच्या कार्यक्रमाचे संकल्पना व सुनियोजित नियोजन एन.डी. खान (संस्थापक, MLKSS व ABF) , प्रमुख आयोजक सौ. सलमा खान ( संचालिका, कार्य दर्पण) , तर या कार्यक्रमाचे सुंदर आवाजात निवेदन सौ. अनघा जाधव (निवेदिका व साहित्यिक) यांनी केले . स्वागतोत्सुक डॉ. ईसा शेख, डॉ. विजय मोरे, विजय भोसले, स्नेहा चांदोरकर, मुश्ताक हाशमी, नागोराव तायडे, प्रतिभा किर्तिकर्वे, दिपक कदम, गुलाब सलाट आदी उपस्थित होते .
हा ” सन्मान ” माझी जबाबदारी वाढवणारा व भविष्यातही समाज हितासाठी निष्ठेने कार्य करण्याची ” प्रेरणा ” देणारा असून मला गौरविल्याबद्दल ” कार्य दर्पण युट्युब चॅनल, महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था आणि सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत समाजसेवेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची घेतलेली ही दखल माझ्यासाठी ” अभिमानाची ” बाब आहे. माझ्या प्रत्येक उपक्रमात साथ देणारे कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी आणि सर्व शुभेच्छुक यांचेही मनापासून धन्यवाद देत आपल्या ” प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच ” हा सन्मान प्राप्त होऊ शकला , आपल्या सर्वांच्या ” शुभेच्छा व आशीर्वाद ” असेच कायम लाभोत, असे मत सत्कार मूर्ती ॲड. सुषमा ढाकणे यांनी या शुभ प्रसंगी व्यक्त केले . त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक – कला – क्रीडा – वकिली क्षेत्रातील व भाजप परिवारातील तसेच ते रहात असलेल्या विठ्ठल नगर प्रभागातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.




