……” खोपोली येथील रेश्मा चिमण कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड “…..
कर्जत खालापूर तालुका सहित संपूर्ण जिल्ह्यातून " अभिनंदनाचा " वर्षाव !

अन्यायग्रस्त महिलांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना ” न्याय ” देण्याचा प्रयत्न करणार…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून , शोषित – पीडित – समस्याग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीर उभे राहून न्याय देणाऱ्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहरातील ” डॅशिंग नेतृत्व ” तथा ” दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटने ” च्या खालापूर तालुका महिला अध्यक्षा ” रेश्मा चिमण कांबळे ” यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड नुकतीच मुंबई येथे बुधवार दिनांक १० जून २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना झालेल्या कार्यक्रमात त्यांची नियुक्ती करण्यात आली . याप्रसंगी महाराष्ट्र मधून आलेल्या पक्षाचे नेते – पदाधिकारी – प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ” मा. पंडित कांबळे साहेब ” यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

रेश्मा कांबळे या खोपोली येथील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या , छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकर – अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांच्या चळवळीत सक्रिय पणे काम करणाऱ्या , गोर गरीब – शोषित – वंचित महिलांच्या पाठीशी ठाम उभ्या असतात. आपले वडील चिमण उर्फ ” सी. एम. कांबळे ” यांनी ” पँथर संघटनेत ” काम केले असल्याने त्यांना वडिलांकडूनच घरातूनच प्रेरणा मिळून , अबला न रहाता ” जिजाऊ मांसाहेबांची ” शिकवण मिळाली आहे . महिलांवर अन्याय झाला असता , गप्प न बसता त्याच तडफेने उत्तर देणे गरजेचे असल्याची भूमिका रेश्मा कांबळे यांची असते. याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती समाजात न्यायासाठी प्रतीक्षेत असलेल्या महिलांच्या पाठीशी खंबीर साथ देण्यासाठी रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी मा. विद्या सरनाईक , सागर बाबा मिसाळ ,उमेश बाबुळगावकर , बाबासाहेब घुमरे , अमर विटे , बाळासाहेब कसबे , सदानंद येलवे , प्रवीण भाऊ तांबे , प्रेरणा तांबे , शेखर वाकोडे , गीता चापके , कोकिळा वाहूर वाघ , विजय बोरे , भानुदास घुगे , विवेक कांबळे , ज्योती मलाले , परमेश्वर गेजगे , हर्षद जाधव , दीपक गवळी , रोहित ससाणे , अंकुशराव ढोबळे , हिरामण गणवीर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक मान्यवर , पदाधिकारी उपस्थित होते .
रेश्मा कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने रायगड सहित कर्जत – खालापूर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत . या पदाला साजेसे कार्य करून अन्यायग्रस्त महिलांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना ” न्याय ” देण्याचा प्रयत्न करेन , तर महिला सक्षमीकरण करण्यास त्यांच्या ” पंखात ” आर्थिक बळ देऊन स्वतःच्या पायावर उभे रहाण्यास सहकार्य करेन , व राष्ट्रवादी पक्षाला बळकटी देऊन पक्ष वाढवेन , असे मत नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्ष ” रेश्मा चिमण कांबळे ” यांनी व्यक्त केले आहे .




