…..” पुण्योदय हॉल व जुनी नगरपालिका येथील कचरा उचलण्यात नगरसेवक ॲड रोहित ओसवाल यांचा पुढाकार “……
कृपया करून या पुढे कोणीही तिथे कचरा टाकू नये , असे केले आवाहन !

” स्वच्छ कर्जत – आपली जबाबदारी “, नगरसेवक ” ॲड. रोहित ओसवाल ” यांनी कर्जतकर नागरिकांना दिला संदेश……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद प्रशासन ” स्वच्छतेवर ” अधिक भर देऊन या विभागाचे कामगार वर्ग ” स्वच्छ कर्जत – सुंदर कर्जत ” करत असताना काही नागरिक मुख्य जाण्यायेण्याच्या जागेवर कचरा टाकून परिसर ” घाण व दुर्गंधीयुक्त ” करत आहेत. मात्र नागरिकांना ” शिस्त ” लावणे , हे आपली ” जबाबदारी व कर्तव्य ” समजून त्या परिसरातील स्वच्छता करून घेऊन ” स्वच्छ कर्जत – आपली जबाबदारी “, हा संदेश ” नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल ” यांनी कर्जतकर नागरिकांना दिला आहे .

कर्जत नगर परिषद हद्दीतील बाजारपेठेत असलेल्या जुन्या नगर परिषद कार्यालयाच्या पाठीमागे बंद असलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या जवळ घाणीचे साम्राज्य तेथे कचरा टाकल्याने झाले होते . येथेच महावीर पेठ कडे जाणारा रस्ता तर जैन समाजाचे संत रहाण्याचे व कार्यक्रमाचे ठिकाण असलेले ” पुण्योदय ” असलेली पवित्र वास्तू येथेच असल्याने पुण्योदय ते जुनी नगर परिषद कार्यालय या परिसरातील सर्व कचरा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले ” नगरसेवक ॲड रोहित राजेंद्र ओसवाल ” यांनी पुढाकार घेऊन येथील सर्व कचरा कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छता दुतांकडून साफ करून घेतला .

त्याचप्रमाणे येथे कचरा टाकणाऱ्या नागरिकांना कृपया करून या पुढे कोणीही तिथे कचरा टाकू नये , असे आवाहन करून ” स्वच्छ कर्जत – आपली जबाबदारी “, असा संदेश ” नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल ” यांनी कर्जतकर नागरिकांना दिला आहे . त्यामुळे कर्जतमध्ये त्यांच्या या कार्याचे ” कौतुक ” होत असताना दिसत आहे .





