Uncategorized

…..” हा तर साहेबांचा आदेश “…..

शिवसेना पक्ष नेते तथा उप मुख्यमंत्री " एकनाथजी शिंदे साहेब " यांच्या शब्दाखातर विधान परिषद निवडणुकीत " राष्ट्रवादीला " सहकार्य !

आम्ही पक्षाचा ” आदेश ” मानणारे कार्यकर्ते……रायगडातील ” आमदारांचा ” खुलासा……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कोकण विभाग विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेचे मताधिक्य जास्त असताना राष्ट्रवादी हा ३ नंबरचा पक्ष असतानाही त्यांच्या पक्षाला व त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे यांचे सुपुत्र ” अनिकेत तटकरे ” यांना उमेदवारी मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रायगडातील ३ आमदारांनी एकेकाळी तटकरे कुटुंबियांच्या विरोधात ” दंड थोपटून ” लढाई लढली होती , तर सुनील तटकरे यांनी देखील या शिवसेनेच्या ३ आमदारांविरोधात प्रचंड ” षडयंत्र ” रचलेले असताना पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर अखेर त्यांना ” होकार ” देऊन दोन पावले मागे घेतल्याचे चित्र दिसत आहे . म्हणूनच आता राष्ट्रवादीचे कोकण विभाग विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा दिला आहे . या पाठिंब्यामुळे रायगडातील शिवसेना पक्षात पदाधिकारी व कार्यकर्त्यांत जरी ” असंतोष ” पसरला असला तरी ” हा साहेबांचा आदेश होता ” ,आम्ही पक्ष प्रमुखांचा आदेश मानणारे कार्यकर्ते , असल्याचा खुलासा यानिमित्ताने शिवसेनेच्या ३ आमदारांनी केला आहे .

            अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांची कन्या ” जुईली महेंद्र दळवी ” यांनी अपक्ष म्हणून कोकण विभाग विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता . मात्र शिवसेना नेते व पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री ” एकनाथजी शिंदे साहेब ” यांनी दिलेल्या आदेशाने व पक्ष नेतृत्वाने दिलेल्या शब्दाचा मान राखणारे कार्यकर्ता असल्याने आम्ही उमेदवारी मागे घेतली आहे , असा खुलासा त्यांचे वडील तथा आमदार ” महेंद्र शेठ दळवी ” यांनी केला आहे .

            तशीच अवस्था कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांची भूमिका झाली असून ते देखील शिवसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री ” एकनाथजी शिंदे ” यांचे खंदे व सच्चे समर्थक आहेत . साहेबांनी दिलेला आदेशाचे पालन करणारे असल्याने पक्ष आदेश पाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी निवडणुकीत इतके ” षडयंत्र ” करूनही व कर्जत मतदार संघात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” हे महायुतीत सहभागी असतानाही ते देत असलेले ” काटे की टक्कर व संघर्ष ” करत असतानाही राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते . साहजिकच या दृश्यामुळे कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा संताप उफाळून आला . मात्र ” हा शिंदे साहेबांचा आदेश ” असल्यानेच हे चित्र पाहायला मिळत असल्याचे , त्यांच्या भूमिकेवरून दिसून येत आहे.

          महाडचे आमदार तथा राज्याचे मंत्री ” भरत शेठ गोगावले ” यांना आगामी काळात रायगडाचे ” पालकमंत्री ” पद मिळणार असल्याने व राज्यात पक्ष महायुतीत असल्याने तिन्ही पक्षाचे प्रमुख भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या निर्णयामुळेच राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पक्ष नेतृत्वाचा ” आदेश ” म्हणून आमची हि भूमिका असल्याचे मत मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या सुपुत्राने मांडले आहे .

        राजकारणात कुणीही कुणाचा ” मित्र ” नसतो , तसा कायमस्वरूपी ” शत्रू ” देखील नसतो . बेरजेचे ” राजकारण ” करताना २ पावले मागे देखील यावे लागते , तसेच कायमस्वरूपी आपल्या मतांशी ठाम देखील राहून चालत नाही . मित्र पक्षांच्या सहकार्याने राज्यात सत्तेत असल्याने पक्ष नेतृत्व ठरवेल , तो आदेश मानावाच लागतो , हेच कोकण विभाग विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!