Uncategorized

…..” कडाव येथे दिवंगत भिमाबाई बारकू मोरे यांचे ५ व्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न “……

कर्जत - खालापूर तालुक्यातील " ५४० " वे रक्तदान शिबिर !

महारक्त वीर ” राजाभाऊ कोठारी सर ” यांचे मोलाचे सहकार्य , ३० रक्तदात्यांनी ” रक्तदान ” करून केले देशव्यापी कार्य……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील कडाव येथे ” दिवंगत भिमाबाई बारकू मोरे ” यांचे ५ व्या स्मृती दिनानिमित्त ” रक्तदान शिबिर ” घेऊन देशव्यापी कार्य केले . कर्जत खालापूर तालुक्यातील ५४० वे रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक ३० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत ” सिद्धार्थनगर बुद्धविहार कडाव ” येथे आयोजित करण्यात आले हॊते . याप्रसंगी एकूण ३० रक्तदात्यांनी  रक्तदान करुन ” राष्ट्रीय – सामाजिक व मानवतावादी ” कार्य करुन सहकार्य केले . या रक्तदान शिबिरात ” नितिन गायकवाड ” यांनी प्रथम रक्तदान केले. 

         याप्रसंगी सर्वं रक्तदात्यांना सन्मान पत्र व हापूस आंब्याचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अन्नदान सुध्दा करण्यात आले. यावेळी कृष्णा जाधव , जयवंत म्हसे व मनोज निकम , राजू गायकवाड हे मान्यवर उपस्थित हॊते. सर्वं उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

         याप्रसंगी संतोष बारकू मोरे यांनी सर्वं समाजा पुढे एक चांगला आदर्श उभा केला , मोरे यांनी अन्नदान, रक्तदान व पर्यावरण साठी हापूस आंब्याची रोपे देऊन ” त्रिवेणी संगम ” रुपी आदर्श निर्माण केला . त्याबद्दल संतोषजी मोरे व त्यांचे सर्वं कुटुंबीय यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन करण्यात आले .

        याप्रसंगी रक्त संकलनाचे काम बदलापूर येथील ” माया ” रक्त केंद्राचे डॉक्टर, टेक्निशियन व सर्वं आरोग्य सेवकांनी उत्तम पद्धतीने केले .

         हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मोरे , शिंदे , गायकवाड , कदम , सरावते , धनगावकर तसेच बौद्ध तरुण व ग्रामस्थ तसेच रमाई मंडळाने विशेष परिश्रम घेतले . या देशव्यापी कार्यात सर्वांनी सहभाग , रक्तदान केले म्हणून सर्वांचे आयोजक मोरे, शिंदे, गायकवाड, कदम व धनगावकर, सरावते परिवार, तसेच बौद्ध तरुण व ग्रामस्थ आणि रमाई मंडळ, कडाव व रायगड भूषण – महारक्तवीर – सार्वजनिक रक्तदाता – नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!