कर्जतमध्ये ” बकरी ईद ” निम्मित शिवसेना शहर संघटक ” नदीम भाई खान ” यांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा “…..
सर्व धर्म बांधवांनी शांततेत तसेच उत्साहात " बकरी ईद " केली साजरी !

बकरी ईद सण म्हणजे ” त्याग – समर्पण – दान आणि बंधुभाव ” याचे प्रतिक……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
मुस्लिम बांधवांच्या ” बकरी ईद ” सणाच्या पार्श्वभूमीवर कर्जत मध्ये सर्व मुस्लिम समाज बांधवांनी कर्जत शहरातील मशीद येथे नमाज अदा करून एकमेकांना ” बकरी ईदच्या ” शुभेच्छा दिल्या .

कर्जतमध्ये गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी ” बकरी ईद ” सण शांततेत , व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .मुस्लिम समाजामध्ये महत्वाचा व त्यागाचा सण म्हणून ” बकरी ईदला ” अनन्य साधारण महत्व आहे . यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम भाई खान यांनी सर्व समाज बांधवांना व कर्जतकर नागरिकांना ” बकरी ईदच्या ” शुभेच्छा दिल्या .

इस्लाम धर्मात ” बकरी ईद ” या सणाला ” ईद-उल-अजहा किंवा ईद-उल-जुहा ” असेही म्हणतात. हा सण पैगंबर हजरत इब्राहिम यांच्या ” अल्लाह ” वरील निस्सीम श्रद्धा आणि त्यागाची आठवण म्हणून साजरा केला जातो. मान्यतेनुसार, अल्लाहने इब्राहिम यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना आपला सर्वात प्रिय मुलगा इस्माईल याचा बळी देण्यास सांगितले. इब्राहिम बळी देण्यास तयार झाले, तेव्हा अल्लाहने त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन इस्माईलच्या जागी एक ” मेंढा ” ठेवला. तेव्हापासून हा ” त्यागाचा दिवस ” म्हणून साजरा केला जातो. रमजान ईदनंतर सुमारे ७० दिवसांनी हा सण येतो. याच काळात ” मक्का ” येथे ” हज ” यात्रा पूर्ण होते.

” बकरी ईद ” फक्त प्राण्यांची कुर्बानी नाही , तर त्याग, समर्पण, दान आणि बंधुभाव हा याचा मुख्य संदेश आहे. आपल्या मनातील लोभ, अहंकार, राग यांसारख्या वाईट सवयींची कुर्बानी देणे, हेच या सणाचे खरे मर्म आहे , असे मत व्यक्त करत सर्व कर्जतकर नागरिकांना ” ईद मुबारक ” म्हणत ” बकरी ईदच्या ” सर्वांना शुभेच्छा शिवसेना कर्जत शहर संघटक ” नदीम भाई खान ” यांनी दिल्या .





