Uncategorized

…..” कर्जत नगर परिषदेला मागासवर्गीय कल्याण विशेष समिती सभापती निवडीचा पडला विसर “……

" परिवर्तन विकास आघाडीच्या " नेत्यांमध्ये हि हालचाल नाही !

लवकरात लवकर निवड करण्याची ” बहुजन समाजाची ” संतप्त मागणी……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषदेचा निकाल लागून ५ महिने झाले असून ” कर्जत परिवर्तन विकास आघाडीची ” सत्ता कर्जतमध्ये रुजू झाली आहे . नगराध्यक्षा – उपनगराध्यक्ष व सर्व विविध समितींचे सभापतींची निवड झालेली असताना ” मागासवर्गीय कल्याण विशेष समिती सभापतीची ” निवड अद्यापि झाली नसल्याने पालिका प्रशासन व ” परिवर्तन विकास आघाडीच्या ” नेत्यांना त्याचा ” विसर ” पडला की , अनुसूचित जाती असलेल्या प्रभागात विकास कामांवर हा अन्याय चालला आहे ? अशी संतप्त चर्चा सध्या कर्जत नगरीत होत असताना दिसत आहे . 

          गत वेळेला शिवसेना – भाजपा – आर पी आय पक्षाची कर्जत नगर परिषदेवर सत्ता असताना नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांच्या सत्ता काळात अनुसूचित जाती महिला आरक्षण गुंडगे प्रभागातून निवडून आलेल्या ” सौ. वैशाली मोरे ” या मागासवर्गीय कल्याण विशेष समिती सभापती म्हणून त्यांची निवड केली होती , मग आताच्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या सत्तेत अनुभवी नगरसेवक असताना ” मागासवर्गीय कल्याण विशेष समिती सभापती ” निवडीचा विसर कसा पडला ? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे . परिवर्तन विकास आघाडीचे नेते तथा ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व माजी गटनेते नितीन दादा सावंत , राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे , हे अनुभवी नेतृत्व आहेत , तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ पुष्पा ताई दगडे , उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील , यांना देखील चांगलाच अनुभव असताना अजून पर्यंत हि निवड का झाली नाही , अशी चर्चा होत आहे .

          कर्जत नगर परिषद हद्दीत कर्जत बौद्ध नगर , दहिवली , आकुर्ले , गुंडगे , पंचशील नगर , भिसेगाव , मुद्रे , या प्रभागात अनुसूचित जाती वस्ती असताना मागासवर्गीय कल्याण विशेष समिती सभापतींची निवड झाल्यास या निधीतून येथील विकास कामांना चालना मिळू शकते , मग हा अन्याय का ? तरी त्वरित कर्जत नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व परिवर्तन विकास आघाडीचे नेत्यांनी हि मागासवर्गीय कल्याण विशेष समिती सभापती निवड त्वरित करण्याची संतप्त मागणी बहुजन समाजात जोर धरू लागली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!