……” कर्जतमध्ये ” हजरत सय्यद युसूफ शाह बाबांचा ” उरूस उत्साहात साजरा “…..
उरुस मध्ये " दर्गाह " वर मन्नत च्या अनेकांनी चढवल्या चादरी !

सर्व समाजाच्या अनेक ” भाविकांनी ” घेतले दर्शन……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील सर्वधर्मसमभावाचे ” प्रतीक ” असलेले कर्जत मधील उल्हास नदीच्या तीरी ” हजरत सय्यद युसूफ शाह बाबांचा ” उरूस सोमवार दि .६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात कर्जतमध्ये साजरा झाला , यानिमित्ताने बाबांच्या भक्तांनी व उरूस कमिटी ने दर्ग्यात जय्यत तयारी केली होती . यावर्षी संदल मिरवणूक निघून बाबांना सलामी देण्यात आली . हजारोंच्या संख्येने यावेळी सर्व समाजाचे भाविक दर्शनासाठी आले होते.

शेकडो वर्षापासून ” हजरत सय्यद युसूफ शाह बाबांचा ” कर्जतमधील दर्गाह मुंबई पासून पुण्या पर्यंत तर रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे .या बाबांचे हजारो भक्त सर्व जाती धर्माचे आहेत .जवळ जवळ १०० वर्षे येथे बाबांच्या उरुसाला होत असल्याचे समजते . प्रतिवर्षी या उरुसाला सर्वच समाजाचे भक्तगण , मुस्लिम समाज आवर्जून उपस्थित रहातात . बाबांच्या दर्ग्यात मागितलेली ” मन्नत ” पूर्ण होते , अशी भक्तांची धारणा असल्याने पूर्ण झालेली मन्नत फेडण्यासाठी अनेक कुटुंब या दिवशी येऊन दर्गाह वर चादर चढवीत असतात . जुने आजार , वाईट पीडा , दोष धारणा ,भूत-प्रेत बाधा , यासारखे बाधीत कुटुंबे इथे येतात , त्याचप्रमाणे बाबांच्या या दर्ग्याचे मुंबई पासून पुण्यापर्यंत व रायगड जिल्हा , कर्जत तालुक्यातील असलेले भक्त येथे सकाळपासून हजर रहातात. येथे अनेक भक्त प्रसाद वाटप करतात तर अनेक सेवाभावी संघटना , मंडळे व भक्तगण यांनी खीर , सरबत , नाश्ता , प्रसाद म्हणून भाविकांसाठी ठेवले होते .मोठ्या उत्साहात हा उरूस साजरा करण्यात आला .
तर बाबांचे शिष्य असलेले ” हजरत कमलुद्दीन शाह बाबा उर्फ सर्कीट शाह बाबा ” मुंबई – गोवंडी कमिटी अध्यक्ष संजू दादा इंगळे आणि मित्र परिवार यांनी येणाऱ्या भक्तांना न्याज ( जेवण ) ठेवले होते . हजरत कमलुद्दिन शाह बाबा , उर्फ सर्किट बाबा ग्रुपचे कर्जत – मुंबई – पुणे – लोणावळा – गोवंडी – खोपोली – चेंबूर – अंबरनाथ येथील भक्तगणांचे अध्यक्ष संजू दादा इंगळे , बंटी पालांडे , संदीप पालांडे , अमर सावंत , उमेश इंगळे , त्याचप्रमाणे अनेक भक्तगण उपस्थित होते .

यावेळी या उरुसास कर्जत न.प. च्या माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. सुवर्णा जोशी , नगरसेवक बाबू पाटील , नगरसेवक राजाभाऊ कोठारी सर , माजी नगरसेवक दिपक मोरे , शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम भाई खान , शिवसेना युवा उप तालुका प्रमुख बॉबी शेठ वाघमारे , बी एस पी चे कर्जत शहर अध्यक्ष सचिन चव्हाण , विजय शेठ पाल , घारु , भरत पवार , त्याचप्रमाणे अनेक राजकीय , धार्मिक मंडळी , मुस्लिम समाज अध्यक्ष व कमिटी , तसेच मुस्लिम बांधव , महिला वर्ग यांनी सकाळ पासूनच दर्शनाचा लाभ घेतला .

यावेळी दर्गाह परिसरातील गार्डन – रोषणाई – सुशोभीकरण व रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने येथील परिसर रंगबिरंगी प्रकाश झोताने उजळून निघाला होता .





