Uncategorized

…..” कर्जत – पोसरी ते विधान भवन एक खडतर प्रवास “……

ना झुकेगा तू - ना रुकेगा तू - ना मुडेगा तू.....कर शपथ ...कर शपथ ....कर शपथ !

विकास कार्याचा अटकेपार झेंडा नेणारे , ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” एक महान व्यक्तिमत्त्व…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” मी सर्वांना पुरून उरणार , व विजयी होणार ” अशी भीष्म गर्जना करत सन २०२४ ची झालेल्या वादळी निवडणुकीत अनेक बलाढ्य शक्तींना नामोहरम करत ” विजयश्री ” खेचून आणणारे कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे एक ” ध्येयवेडे नेतृत्व ” म्हणून पाहण्यास मिळतात . अस म्हणतात कि , एखादी व्यक्ती ध्येयाने पछाडली तर ते ध्येय साध्य करेपर्यंत शांत बसत नाही , हाच धागा पकडून ” गगनाला गवसणी ” घालून आपल्या मतदार संघाचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवून विकास कामे काय असतात , हे दाखवून देणारे व त्यासाठी भिंगरी सारखे १८ तास काम करणारे कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे हे एक ” राजकीय पटलावर महान व्यक्तिमत्त्व ” म्हटले तर ते वावगे ठरणार नाही . 

        अतिशय खडतर असा त्यांचा ” पोसरी ते विधानसभा भवन ” एक राजकीय प्रवास आहे . त्यांच्या जीवनाच्या अंतरंगात डोकावल तर एक ध्येयवादी – महत्त्वाकांक्षी – जे ठरल ते घडवणारा असा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा मावळा , हेच दिसेल . याच जोरावर त्यांची राजकीय कारकीर्द घुसळून निघालेल्या ” हलाहल ” सारखीच व ते प्राशन करून पचवणे , हेच त्यांच्या ” राजकीय यशाचे ” गुपित म्हणावे लागेल . साधा ” शिवसैनिक ते उपजिल्हाप्रमुख ” हि त्यांची कारकीर्द सर्वांच्याच आठवणीतील आहे . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ” ज्वलंत विचार ” व आपल्या ” मनगटाच्या ताकदीवर ” त्यांनी शिवसेना या कर्जत खालापूर तालुक्यात जिवंत ठेवली . सन २०१४ साली विधानसभेची शिवसेनेची तिकीट मिळाली नाही , पण त्याही परिस्थितीत न डगमगता दोन नंबरची मते मिळवून फक्त ” १८०० ” मतांच्या फरकाने झालेला पराभवाने न खचता , ” तु अजुन जिंकला नाहीस ” , हे मनाला समजावून पुन्हा उभारी घेवून २०१९ साली मोठ्या मताधिक्याने निवडून येणारा व पुन्हा २०२४ साली देखील सर्वांच्या सहकार्याने निवडून येऊन हे ” नेतृत्व ” काही वेगळच म्हणाव लागेल . 

             त्यांनी आमदारकी हाताशी असताना हातावर हात ठेवून गप्प न बसता आजपर्यंत २ हजार करोड रुपये इतका निधी आणून गाव – वाडे – पाडे – शहर – प्रभाग – ग्रामीण भागापर्यंत ” विकासाची गंगा ” नेवून दोन्ही तालुके सुजलाम – सुफलाम असा परिसर , पर्यटकाला साजेसा केला आहे . शिवसृष्टी , छत्रपती संभाजी महाराज स्मारक , ऐतिहासिक वास्तू , थोर निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार , उल्हास नदीच्या तीरावर प्रती पंढरपूर श्री विठ्ठलाची ५२ फुटी सुंदरशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व आता श्रीरामाची ३० फुटी मूर्ती बसवून संपूर्ण महाराष्ट्राला कर्जतमध्ये ते रूप पहाण्यास लावणारे , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मनात आलेली हि ” संकल्पना ” आपल्या जन्मदाते आई – बाबांच्या संस्कारातून घडल्याचे ते सांगतात . ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन , भजन सम्राट – महाराष्ट्र भूषण गजानन बुवा पाटील स्मारक ” या कार्याचे देखील सर्व बहुजन वर्गात कौतुक होत आहे . त्यांच्या या यशस्वी राजकीय प्रवासात त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद , शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार , मनोहर दादांची यशस्वी साथ , लहान भाऊ विश्वनाथ याची मदत , सावली सारखी मागे बळ देणारी त्यांची पत्नी सौ. मीना ताई , त्यांचे पुतणे प्रसाद , घरातील सर्व सदस्य व शिवसैनिकांची प्रचंड ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे . 

           मा. मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अत्यंत निकटवर्तीय अशी ख्याती असलेले कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी त्यांचे आशीर्वाद घेवून पुन्हा एकदा राजकीय पटलावर ” व्हिजन – २ ” मध्ये गरुड भरारी घेण्यासाठी बळ मिळवले आहे . कर्जत खालापूर मतदार संघात त्यांच्या सारखे ” लोकप्रतिनिधी – लोकनायक व लोकनेते ” होणे , अशक्यच आहे . राजकीय क्षितिजावर हा चमकणारा ” अमूल्य तारा ” , असाच चमकत राहून त्यांच्या हातून अनगणीत कार्य घडो , व ते करण्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहो , हिच ईश्वरचरणी प्रार्थना , कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना ” ०७ एप्रिल २०२६ ” रोजी वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!