Uncategorized

……” यशवंतराव काळूराम कुंभार उर्फ वाय.के. रायगड समाज भूषण पुरस्काराने सन्मानित “……

माणगाव येथे " कुणबी समाज हॉल " मध्ये मान्यवरांच्या हस्ते केला सन्मान !

” कुंभार समाजाचा ” रायगड जिल्हा मेळावा उत्स्फूर्तपणे संपन्न…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील खांडपे येथे रहाणारे व राजकीय – सामाजिक – कामगार – सहकार क्षेत्रात आजपर्यंत अव्वल काम करणारे ” यशवंत काळूराम कुंभार उर्फ वाय.के. ” यांना माणगाव तालुक्यात कुणबी समाज हॉल येथे झालेल्या रायगड जिल्हा कुंभार समाज मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ” रायगड समाज भूषण ” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले . यावेळी कुंभार समाज मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिश दादा दरेकर , महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा रसिका खेडेकर , रायगड जिल्हा अध्यक्ष महाडकर , रायगड जिल्हा युवक अध्यक्ष शरद कुंभार त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते .   

            यशवंत कुंभार उर्फ वाय. के. हे कर्जत तालुक्यातील खांडपे येथील रहिवासी आहेत . जुनी १० पर्यंत शिक्षण झालेले असल्याने खोपोली येथील ” झेनिथ स्टील ” कंपनीत कामगार म्हणून त्यांनी २० वर्षे काम केले . कामगारांना न्याय – अधिकार देण्यासाठी व त्यांची बाजू लढण्यासाठी ते ” दत्ता सामंत ” यांच्या युनियन मध्ये ” कामगार लीडर ” म्हणून १० वर्षे त्यांनी काम चोख बजावले . कालांतराने कर्जतच्या राजकारणात त्यांनी उडी मारली . ” राष्ट्रीय काँग्रेस पक्षात ” काम करत कर्जत तालुका उपाध्यक्ष , तालुका संघटक , पद सांभाळत काँग्रेस पक्ष कर्जत तालुक्यात तळागाळात पोहचवला . माजी आमदार तुकाराम अण्णा सुर्वे , राजिप चे माजी बांधकाम , व अर्थ सभापती बंधू पाटील , माजी सभापती सुरेश भाऊ लाड , यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ” अंतुले साहेबांचे ” हात मजबूत केले होते . कर्जत तालुका सहकार क्षेत्रात देखील निवडून येऊन ते संचालक झाले , तर कर्जत तालुका शेतकरी सहकार संस्थेत देखील ते चेअरमन होते .

             रायगड जिल्हा कुंभार समाजात देखील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे . कर्जत तालुक्यात कुंभार समाज एकसंघ ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे . दरवर्षी खांडपे गावात ” श्री संत गोरोबा काका ” यांचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात . कर्जत तालुका कुंभार समाज अध्यक्ष , रायगड जिल्हा संघटक , जिल्हा सल्लागार , कोकण विभाग उपाध्यक्ष , अशी विविध पदे त्यांनी सांभाळून कुंभार समाजाला मजबूत करण्याचे काम यशवंत कुंभार यांनी केले आहे . 

           त्यांना रायगड जिल्हा, कुंभार समाजाच्या वतीने ” रायगड समाज भूषण ” पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे राजकीय – शैक्षणिक – धार्मिक – सामाजिक – सहकार – कला – क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या , तर सध्या ते भिसेगाव येथे राहत असल्याने त्यांना कोकण विद्यालयाचे श्री शरद खराडे ,कर्जत पालिका अधिकारी बाळा निकाळजे , नवी मुंबई कामगार नेते चरण जाधव , ठाकरे शिवसेनेचे कर्जत संघटक बाळा ठाकरे , रोहित देशमुख , जगदीश कडू , संतोष ठाकरे , सतीश हजारे , मोहन कासुर्डे , महेश गिडवाणी , दशरथ ठाकरे , सचिन चव्हाण व भिसेगावातील अनेक मित्र परिवार , कुटुंब सदस्यांनी त्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या . विशेष म्हणजे ०४ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या वाढदिवशी ते ७२ वर्षात पदार्पण करत असल्याने हा ” रायगड समाज भूषण ” पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांनी आजवर केलेल्या कार्याचे ते ” अनमोल गिफ्ट ” असल्याचे भावनिक मत ” यशवंत कुंभार उर्फ वाय. के. ” यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!