Uncategorized

……” शासनाने दाखवला ठेंगा , कर्जत तालुक्यातील ठेकेदार आक्रमक “……

पनवेलचे कार्यकारी अभियंता " संदिप चव्हाण " यांना कार्यालयात घेराव !

३१ मार्च पर्यंत बिले पास करा , अशी मागणी करत ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष ” राहुलजी डाळींबकर ” यांच्या नेतृत्वाखाली ” क्रोध ” मोर्चा……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

नुकतेच कर्जत तालुक्यातील ठेकेदार संघटनेने आपली ” २०४ कोटी ” रुपयांच्या प्रलंबित बिलांसाठी बेमुदत उपोषण केले होते . यावेळी ३१ मार्च पर्यंत आपली बिले पास करून आपल्याला विकास कामांची रक्कम देण्यात येतील , असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे पनवेलचे कार्यकारी अभियंता ” संदिप चव्हाण ” यांनी दिले होते . मात्र चार दिवस फेऱ्या मारून आज ३० तारखेपर्यंत काहीच माहिती न दिल्याने शासनाला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा कार्यकारी अभियंता ” संदिप चव्हाण ” यांच्या पनवेल येथे कार्यालयात जाऊन कर्जत तालुक्यातील ठेकेदारांनी संघटनेचे अध्यक्ष ” राहुलजी डाळींबकर ” यांच्या नेतृत्वाखाली ” घेराव ” घालून खाली बैठक ठोकून ” ठिय्या आंदोलन ” करत आपला संताप ” निषेध घोषणा ” देऊन व्यक्त केला . 

     

   

गेली ३ वर्षांपासून कर्जत तालुक्यात केलेल्या विकास कामांची बिले मिळण्यासाठी ठेकेदारांनी कर्जत उप अभियंता कार्यालय , पनवेल कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय तर प्रसंगी मंत्रालयाचे दार ठोठावून देखील ठेकेदारांची ससेहोलपट झाली आहे . उपासमारीची वेळ , उधारी चा तगादा , व कर्जाचे डोंगर माथ्यावर घेऊन फिरण्या पेक्षा ” संविधानाने ” दिलेल्या अधिकार व हक्काचा वापर करत ठेकेदारांनी ” बेमुदत उपोषणाचा ” मार्ग पत्करला होता . त्यातून मिळाल्या आश्वासनाची पूर्तता होण्यासाठी आता ठेकेदारांनी ” आक्रमक रूप ” धारण करत थेट पनवेल येथे जाऊन कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण यांच्या दालनात त्यांना घेराव घालून खाली बसून ठिय्या आंदोलन करत शासनाच्या या दखल न घेणाऱ्या निर्णयाचा जाहीर निषेध घोषणा देऊन केला , व ३१ मार्च २०२६ पर्यंत आमची बिले पास करण्याची संतप्त मागणी अध्यक्ष राहुलजी डाळींबकर यांच्या नेतृत्वाखाली केली . 

       

 यावेळी या ” निषेध क्रोध मोर्च्यात ” कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे सचिव उदय दादा पाटील यांच्यासह संभाजी जगताप, सुनील भालीवडे , पंढरीनाथ पिंपरकर , उत्तम शेळके, राजेश जाधव, गोकुळ खडे, भास्कर दिसले, भूषण भोईर, इरेश्वर गायकवाड, सूर्यकांत चंचे, बाळू ऐनकर, प्रसाद भोपतराव, प्रमोद खडे, शरद बडेकर, प्रमोद म्हसे, लहू श्रीखंडे , जब्बार सहेद , सचिन ओसवाल, दशरथ पोसाटे , आदीं व इतर सर्व ठेकेदार सहभागी झाले होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!