Uncategorized

शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर ” सुधांशु वनगे ” यांची निवड !

४० वर्ष केलेल्या " कार्याचा " मिळाला मान !

संस्थेचा ” नावलौकिक ” अधिक वाढवणार……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

रायगड जिल्ह्यासहित कर्जत खालापूर मतदार संघात ” गिर्यारोहण, सायकलिंग व निसर्ग संवर्धन ” या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व ३८ वर्षाची परंपरा असलेल्या ” शिवशंभो युवा हायकर्स ” कर्जत संस्थेचे उपाध्यक्ष पदी कर्जत नगर परिषद हद्दीतील जेष्ठ व फाऊंडर सदस्य ” सुधांशू वनगे ” यांची निवड एकमताने करण्यात आली.

           सुधांशू वनगे हे १९८६ पासून ” शिवशंभो युवा हायकर्सचे ” क्रियाशील सदस्य असून संस्थेचे जडण घडणीत त्यांनी महत्वाचे कार्य केले आहे . संस्थेचे कार्य पुढे चालू ठेवणे , मुलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे व संस्थेचा नावलौकिक अधिक वाढविणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले . 

          संस्थेला २०२५ चा ” गिरीमित्र गिर्यारोहण संस्था पुरस्कार ” मिळाल्याने त्यांच्या निवडीने अधिक अपेक्षा वाढल्या आहेत. संस्थेच्या वतीने उन्हाळ्या सुट्टीत मुलांसाठी विविध गिर्यारोहण शिबीर , गिर्यारोहण प्रशिक्षण शिबीर व रायगड दर्शन सहल ( सर्वांसाठी ) आयोजित करण्यात येणार आहे , तरी इच्छुकांनी विकास दादा चित्ते – 9270130575 , सुधांशू वनगे – 8983421832 , शैलेश सातपुते – 9146580590 या नंबर वर संपर्क साधावा , असे आवाहन संस्थेने केले आहे . सुधांशू वनगे यांच्या निवडीने त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!